Bollywood च्या 'या' तारका अजूनही दिसतात चिरतरूण, जाणून घ्या यामागचं रहस्य

Bollywood च्या 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्री 10 वर्षातला बदल पाहून तुम्ही व्हाल थक्क    

Updated: Dec 5, 2022, 06:25 PM IST
Bollywood च्या 'या' तारका अजूनही दिसतात चिरतरूण, जाणून घ्या यामागचं रहस्य title=
Bollywood Actress Aishwarya Rai Bachchan & Madhuri Dixitare still seen forever know the secret behind this Plastic Surgery nz

Bollywood Actress Plastic Surgery : आजच्या जगात प्रत्येकाला आपल्या वयापेक्षा सुंदर (Beautiful) दिसायचे असते. सगळेच तरुण दिसण्याची स्वप्न पाहत असतात. वयाचा टप्पा कोणताही असो दिसणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते, मग ती स्त्री असो वा पुरुष.  मग त्यात सामान्य महिला असोत की बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood Actress), आपला चेहरा सुंदर दिसावा यासाठी कोणीतीही कसर सोडत नाहीत. अभिनेत्रींबद्दल बोलायचं झालं तर त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरुनच काम मिळतं मग अशावेळेस त्यांना चेहऱ्याची अधिक काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत अनेक वेळा अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक ट्रिटमेंटचाही (Cosmetic Treatment) सहारा घेतात. 

गेल्या काही काळात अनेक अभिनेत्रींचा लूक बदलला आहे, ज्यासाठी त्या ट्रोलही (Troll) झाल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की गेल्या 10 वर्षांत अभिनेत्रींच्या लूकमध्ये काय बदल झाले आहेत आणि 10 वर्षांपूर्वी त्या कशा दिसत होत्या आणि आज त्यांचे सौंदर्य किती वाढले आहे. (Bollywood Actress Aishwarya Rai Bachchan & Madhuri Dixitare still seen forever know the secret behind this Plastic Surgery nz)

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan)

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये जेव्हा सुंदर अभिनेत्रींच्या नावाची गणना केली जाते तेव्हा ऐश्वर्या राय बच्चनचे नाव देखील टॉप लिस्टमध्ये समाविष्ट होते. मात्र, गेल्या 10 वर्षात ऐश्वर्या रायचा लूक खूप बदलला आहे आणि जेव्हा ऐश्वर्या पोन्नियिन सेल्वन चित्रपटाच्या प्रमोशनवर दिसली तेव्हा ती खूपच वेगळी दिसत होती. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, ओठ आणि चेहऱ्याच्या शस्त्रक्रियेव्यतिरिक्त (Plastic Surgery), ऐश्वर्या राय बच्चनने या चित्रपटासाठी तिच्या नाकाची शस्त्रक्रिया देखील केली आहे.

कतरिना कैफ (Katrina Kaif)

लग्नानंतर कतरिना कैफचा लूकही खूप बदललेला दिसत आहे. बिग बॉस-16 च्या मंचावर कतरिना आली तेव्हा तिने काही कॉस्मेटिक ट्रीटमेंट घेतल्याचे स्पष्टपणे समजले. मात्र, ट्रोलर्स तिच्या मागे लागले असून 'कतरिनाने प्लास्टिक सर्जरीने तिचे सौंदर्य उद्ध्वस्त केले' असे सोशल मीडियावर लिहिले जात आहे. तसे, रिपोर्ट्सनुसार, कतरिनाने तिच्या चेहऱ्यावर बोटॉक्स लावले आहे.

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit Nene)

आजकाल, धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचे सौंदर्य देखील प्रेक्षकांना खोटे वाटते. 'झलक दिखला जा' या रिअॅलिटी डान्स शोमधील तिच्या बदललेल्या लुकमुळे माधुरीने ओठांवर शस्त्रक्रिया केल्याचा अंदाज लावला जात आहे.

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)

जेव्हा प्रियांका चोप्राने तिच्या नाकाचे काम केले तेव्हा लोक तिला प्लास्टिक चोप्रा म्हणू लागले. पण प्रियांकाच्या वैयक्तिक आयुष्यावर त्याचा चांगलाच परिणाम झाला. उलट प्रियंका यशाच्या पायऱ्या चढत गेली.

श्रुती हासन (Shruti Haasan)

श्रुती हासनने स्वतः सोशल मीडियावर प्लास्टिक सर्जरीची बाब स्वीकारली आणि असेही म्हटले की, 'जर एखादी अभिनेत्री म्हणाली की तिने प्लास्टिक सर्जरी केली नाही, तर ती स्पष्टपणे खोटे बोलत आहे'.

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)

45 वर्षांची झाल्यानंतरही शिल्पा तिच्या वयापेक्षा 10 वर्षांनी लहान दिसते. शिल्पाची 10 वर्षांपूर्वीची छायाचित्रे पाहिली, तर आजच्या चित्रांमध्येही तुम्हाला शिल्पा अधिक सुंदर आणि तरुण दिसेल. वास्तविक, शिल्पाने कॉस्मेटिक सर्जरीचाही सहारा घेतला आहे.

अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari)

भूमिकेला मागणी मिळावी आणि वेगळी स्टाईल मिळावी यासाठी अभिनेत्री अनेक वेळा त्यांचे लूक बदलतात आणि त्यासाठी त्या कॉस्मेटिक ट्रीटमेंटचाही अवलंब करतात. अदिती राव हैदरी हिनेही खूप पूर्वी नाकाचे काम केले आहे, त्यानंतर तिचे सौंदर्य वाढले आहे.

अनुष्का शर्मा (Anushka Sharma)

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या ओठांचे सौंदर्य वाढविण्यासाठी कॉस्मेटिक उपचार देखील घेतले आहेत. यावरून तिला खूप ट्रोलही करण्यात आले होते.