Fact Check : खरंच Aishwarya Rai Bachchan नं अभिषेकच्या आधी झाडाशी केलं होतं लग्न?

ऐश्वर्याच्या सलमान खानसोबतच्या अफेअरच्या चर्चांना त्यावेळी खूप जास्त प्रसिद्धी मिळाली. 

Updated: Sep 26, 2022, 01:14 PM IST
Fact Check : खरंच Aishwarya Rai Bachchan नं अभिषेकच्या आधी झाडाशी केलं होतं लग्न?

Aishawarya Rai Marriage Rumour: ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला 15 वर्षे पुर्ण झाली आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या (Aishwarya and Abhishek Marriage) लग्नाच्या आजही खूप चर्चा होतात. पण तुम्हाला माहितीये का अभिषेकचं लग्न ज्याप्रमाणे करिश्मा कपूरशी (Karishma Kapoor) ठरलं होतं तसंच ऐश्वर्याचंही ठरलं होतं. अभिषेकचं करिश्माशी लग्न होऊ शकलं नाही परंतु ऐश्वर्यानं मात्र ते लग्न संपन्न केलं. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल की नक्की ऐश्वर्यानं असं कोणाशी लग्न केलं होतं आणि का केलं होतं, परंतु यातच एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे. 

ऐश्वर्याच्या सलमान खानसोबतच्या (Salman Khan)अफेअरच्या चर्चांना त्यावेळी खूप जास्त प्रसिद्धी मिळाली. विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi), सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे त्रिकूट त्यावेळी प्रचंड चर्चेत होतं. परंतु अभिषेकाच्या आधी ऐश्वर्यांच्या या लपून छपून लग्नाची चर्चा मात्र झाली नाही किंबहूना अनेकांना याची कल्पना नसावी. ऐश्वर्यानं अभिषेकच्या आधी कोणा व्यक्तीशी नाही तर चक्क झाडाशी लग्न केलं होतं. (Aaishwarya Rai Marriage)

आणखी वाचा - Juhi Chawla 'या' स्टार कीड्सच्या प्रेमात, वाचा कोण आहेत ते?

हो, याबाबत खुद्द ऐश्वर्यानं खुलासा केला होता. अभिषेकशी लग्न होण्यापुर्वी ऐश्वर्यानं (Aishwarya Opens Up about Her Marriage with Tree) एका झाडाशी आपला विवाहसोहळी संपन्न केला होता. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेशी बोलताना तिनं हा खुलासा केला होता. आपल्या लग्नाबद्दल बोलता बोलता तिला तिच्याबद्दल पसरलेल्या अशाच एका अफवेवर तिला विचारण्यात आले की तुमच्याबद्दल जी अफवा पसरली आहे की तुम्ही अभिषेक यांच्याशी लग्न करण्यापुर्वी तुम्ही एका झाडाशी लग्न केलं होतं? त्यावर ती म्हणाली की, होय हे खरं आहे. पण अशा अनेक अफवा उडाल्या आहेत. परंतु आम्ही अशा अफवांवर फार लक्ष दिलं नाही. मला तर ही अफवा इतकी बेकार वाटली की मीही याला फार गांभिर्यानं घेतलं नाही, असं उत्तर तिनं दिलं. 

आणखी वाचा - Amir Khan चा मराठी जावई आहे तरी कोण? photos होतायत व्हायरल

लग्नाला घेऊन अनेक अफवा...
यापुर्वही 2016 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या (Aishwarya Rai and Abhishek Bachchan Marriage Rumour) बातम्या पसरल्या होत्या. मात्र अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी लोकांशी संपर्क कमी केला. पण यावर शेवटी त्यांनीच खुलासा केला होता. अभिषेकनं सांगितलं की, मी माझ्या आणि ऐश्वर्यासोबत असे कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला होऊ देणार नाही. मी तिच्यावर किती प्रेम करतो आणि ती माझ्यावर किती प्रेम करते हे मला माहीत आहे."

20 एप्रिल 2007 रोजी ऐश्वर्या आणि अभिषेकचा लग्नसोहळा पुर्ण झाला. त्यानंतर आज 15 वर्षांनंतर हे कपल आजही सगळ्यांसाठी पावर कपल आहे.