बॉलिवूड अभिनेत्रीचा साखरपुड्यानंतर ब्रेकअप, आता एकटीच करणार बाळाचं संगोपन?

अ‍ॅमीने जॉर्ज पानायिटूसोबतचे (George Panayiotou) सर्व फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरुन डिलीट केले आहेत. 

Updated: Jul 28, 2021, 05:24 PM IST
बॉलिवूड अभिनेत्रीचा साखरपुड्यानंतर ब्रेकअप, आता एकटीच करणार बाळाचं संगोपन?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन तिच्या हॉट अंदाजामुळे सोशल मीडियावर बर्‍याचदा चर्चेत असते. तिच्या फोटोंला देखील चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. पण  सध्या अ‍ॅमी जॅक्सन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.अ‍ॅमीचा तिच्या  होणाऱ्या नवऱ्यासोबत ब्रेकअप झाला आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर आता या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं समजतंय. 

अ‍ॅमीने जॉर्ज पानायिटूसोबतचे (George Panayiotou) सर्व फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरुन डिलीट केले आहेत. ज्यामुळे या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. 

जॉर्ज पानायिटूसोबत सारखपुडा झाल्यानंतर अ‍ॅमी खूपच खूश दिसत होती. सारखपुड्याचे काही फोटो अ‍ॅमीने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना प्रेमाची कबुली दिली होती. आता अॅमीने साखरपुड्याचे फोटो देखील डिलीट करुन टाकले आहेत.

अ‍ॅमीच्या सोशल मीडियावर प्रोफाईलवर फक्त तिच्या चिमुकल्या मुलासोबतचे फोटो दिसून येत आहेत. अॅमीने जॉर्जसोबतच्या नात्याबाबत अद्याप अधिकृतरित्या कोणताही खुलासा केलेला नाही.
गरोदर असताना अभिनेत्रीने बॉयफ्रेंड जॉर्ज पानायिटूसाठी अनेक पोस्ट लिहिल्या होत्या.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson)

अ‍ॅमीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये  सांगितलं होत की, जॉर्जबरोबर असताना तिला खूपच पाठिंबा मिळतो. प्रेग्नेंसीदरम्यान आम्ही एकमेकांना चांगलं ओळखत आहोत, जे फार महत्वाचं आहे. ही खूप वेगळी आणि सुंदर वेळ आहे.

अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन 2015 पासून ब्रिटीश बिझनेसमन जॉर्जला डेट करत होती. त्यानंतर 2019 मध्ये जॉर्जने अ‍ॅमीला रोमॅन्टिक अंदाजात प्रपोज केलं. त्यानंतर  3 महिन्यांनंतर अ‍ॅमीने आपण गरोदर असल्याची गुड न्यूज दिली. तिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. पण आता दोघेही वेगळे होत असल्याची बातमी समोर आली आहे.