`83 : रणवीरची दीपिका नव्हे, ही तर कपिलची 'रोमी'

पाहा रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या रुपात कशी दिसतेय दीपिका 

Updated: Feb 19, 2020, 10:32 AM IST
`83 : रणवीरची दीपिका नव्हे, ही तर कपिलची 'रोमी'
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्री असते असं अनेकदा मह्टलं गेलं आहे. हीच ओळ सार्थ ठरवत आणि त्यात काहीसा बदल करत प्रत्येक पुरुषाच्या मागेच नव्हे, तर त्याच्यासोबतही एक खंबीर स्त्री असते अशीच काहीशी भूमिका मांडत दिग्दर्शक कबीर खान याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी deepika padukone दीपिका पदुकोणची निवड केली.  '`८३' या आगामी चित्रपटासाठी त्याने दीपिकाची एका खास व्यक्तीरेखेसाठी निवड केली. ज्यामध्ये ती रोमी देव यांच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

दीपिका या चित्रपटातून कपिल देव यांच्या पत्नीची म्हणजेच रोमी देव यांची भूमिका साकारत आहे. भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवत पहिलावहिला क्रिकेट विश्वचषक देशाला मिळवून देणाऱ्या कपिल देव आणि त्यांच्या संघातील सर्व खेळाडूंच्या कामगिरीवर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. 

रणवीर सिंग Ranveer singh चित्रपटात कपिल देव यांच्या भूमिकेत दिसत आहे, तर दीपिका ही त्याच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेत झळकत आहे. नुकताच या चित्रपटातील तिचा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात आला. ज्यामध्ये दीपिकाचा शॉर्ट हेअर लूक अनेकांचं लक्ष वेधत आहे. 

रोमी देव यांचं एकंदर व्यक्तिमत्वं पाहता दीपिका या भूमिकेत पडद्यावर नेमकी कशी दिसेल याचीच अनेकांना उत्सुकता होती. आता तिचा चित्रपटातील लूक पाहतचा बऱ्याच अंशी रोमी देव यांची भूमिका साकारण्यासाठी दीपिकाच्या लूकवर मेहनत घेण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. सोशल मीडियाववर व्हायरल झालेल्या रोमी लूकमध्ये दीपिका काळ्या रंगाच्या टर्टल नेक आणि पूर्ण बाह्यांच्या एका टीशर्टमध्ये दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर असणारं सुरेख हास्य आणि सोबत असणारा कपिल देव यांच्या भूमिकेतील रणवीर सिंग पाहता या फोटोची फ्रेम खऱ्या अर्थाने परिपूर्ण दिसत आहे. 

पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ 

दीपिका आणि रणवीरचा लग्नानंतर एकत्र झळकण्याचा हा पहिला चित्रपट आहे. या भूमिकेच्या आणि चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याला भारताच्या विश्वविजेतेपदावर पोहोचण्याचे क्षण जगता आल्याचं आनंद तिने व्यक्त केला. त्यामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या दीप-वीरचा हा अंदाज प्रेक्षकांना कसा वाटतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.