मुंबई : सहसा कोणत्याही ठिकाणी जायचं झाल्याच कलाकार मंडळी त्यांच्या कारचा वापर करतात. पण, बी टाऊनच्या काही नवोदित आणि आघाडीच्या स्टारकिड्सना नुकताच त्यांच्या लक्झरी कार सोडून चक्क काली पिली, अर्थात मुंबईच्या रस्स्त्यांवरून धावणाऱ्या टॅक्सीचा आधार घ्यावा लागला.
अभिनेत्री सारा अली खान, जान्हवी कपूर आणि साराचा भाऊ, इब्राहिम खान यांनी रविवारचा वेळ एकत्र व्यतीत केला.
AP Dhillon concert मधून बाहेर येताना या तिघांना पाहिलं गेलं. सहसा ही मंडळी त्यांच्या कार सोडून इतर कोणत्याही वाहनानं प्रवास करताना दिसत नाहीत.
पण, रविवारी चित्र वेगळं होतं. कारण, सारा, जान्हवी आणि इब्राहिमनं यावेळी टॅक्सीनं जाण्याचा पर्याय निवडला होता.
सारा आणि जान्हवीनं टॅक्सीची वाट धरताच माध्यमांच्या नजराही त्यांच्याकडे वळल्या. पाहता पाहता या सेलिब्रिटींच्याच नावाची चर्चा बी टाऊनमध्ये गाजली.
टॅक्सीनं हे तिघंजण नेमके का गेले, याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही, पण बहुधा मुंबईच्या या टॅक्सीचा कलाकारांनाही हेवा वाटला असावा ज्यामुळं त्यांची पावलं इथं वळली असं म्हणायला हरकत नाही.
दरम्यान, अभिनेत्रींची ही जोडगोळी सध्या त्यांच्या मैत्रीमुळं चर्चेत आहे. एकत्र व्यायाम करण्यापासून एकत्र फिरायला जाण्यापर्यंत अनेकदा त्यांना एकत्रच पाहिलं जात आहे. ज्यामुळं बी टाऊनमध्ये या नव्या पिढीच्या अभिनेत्री नव्यानं फ्रेंडशिप गोल्स देऊ लागल्या आहेत अशीच चाहत्यांची प्रतिक्रिया आहे.