न्यासाविषयी प्रश्न विचारताच काजोलचा नाराजीचा सूर

न्यासा ही तुलनेने माध्यमांसमोर कमीच येते.

Updated: Apr 23, 2019, 03:47 PM IST
न्यासाविषयी प्रश्न विचारताच काजोलचा नाराजीचा सूर

मुंबई : कलाविश्वात सेलिब्रिटी हे त्यांच्या कलेशिवाय खासगी आयुष्यामुळेही बरेच चर्चेच असतात. सध्याच्या घडीला बरेच सेलिब्रिटी चर्चेत आहेत ते म्हणजे त्यांच्या मुलांमुळे. बॉलिवूडमध्ये सध्याची ही पिढी म्हणजे एका नव्या उत्साहाची अर्थातच सेलिब्रिटी किड्सची आहे. शाहरुखच्या मुलांपासून ते आमिर आणि सैफच्या मुलांपर्यंत सर्वांवरच माध्यमांच्याही नजरा खिळलेल्या असतात. अशातच आता काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा हिच्याविषयीही काही चर्चा होताना दिसत आहेत. 

न्यासा ही तुलनेने माध्यमांसमोर कमीच येते. पण, ती जेव्हा माध्यमांसमोर येते तेव्हा मात्र तिच्याविषयीचे बरेच प्रश्न अजय आणि काजोलला विचारण्यात येतात. न्यासाने नुकताच तिचा १६ वा वाढदिवस साजरा केला. ज्यानंतर काजोलला एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांकडून तिच्या बॉलिवूड पदार्पणासंदरभात प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर तिने थोडा नाराजीचा सूर आळवल्याचं पाहायला मिळालं. 

'ती (न्यासा) अवघी १६ वर्षांची आहे. माझ्या मते तुम्ही (माध्यमांनी) तिला तिच्या आयुष्यात जगू द्यावं, मोकळं सोडावं. आताच तिने सोळावा वाढदिवस साजरा केला. सध्याच्या घडीला इयत्ता दहावीत शिकत असून, येणाऱ्या परीक्षेची तयारी करत आहे', असं काजोल म्हणाली. फक्त काजोलच नव्हे, तर अजयनेही यापूर्वी न्यासाविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देत ती सध्या फक्त आणि फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रीत करत असल्याचं स्पष्ट केलं होतं. 

अजय आणि काजोलची लेक न्यासा ही सध्या सिंगापूरमध्ये असून, तेथेच ती शिक्षम घेत आहे. तिची भेट घेण्यासाठी अजय आणि काजोलही वारंवार परदेशी जात असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगावं तर, येत्या काळात अजय हा 'तानाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटातून झळकणार आहे. तर, काजोलही त्या चित्रपटात झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.