सारा-कार्तिकच्या नात्याबद्दल करिनाची प्रतिक्रिया

साराच्या कुटुंबातील पहिल्या व्यक्तीने दिली प्रतिक्रिया

Updated: Jan 8, 2020, 04:11 PM IST
सारा-कार्तिकच्या नात्याबद्दल करिनाची प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कार्तिक आणि सारा एकमेकांना डेट करत असल्याचीही चर्चा होती. अनेकदा या दोघांना एकत्र पाहण्यात येतं. या दोघांचे काही फोटोही व्हायरल झाले होते. सारा आणि कार्तिकच्या डेटिंगबाबत आता करिना कपूरने प्रतिक्रिया दिली आहे. आता करिनाच्या उत्तरानंतर पुन्हा एकदा हे दोघे चर्चेचा विषय ठरत आहेत. 

'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत, करिनाला कार्तिकच्या रिलेशनशिपबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर करिनाने मीदेखील शोमध्ये त्याला याबाबत प्रश्न विचारला होता असं सांगितलं. त्यावर कार्तिकने तो सध्या त्याच्या कामाला डेट करत असल्याचं, सांगितल्याचं करिना म्हणाली.

 
 
 
 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

मुलाखतीदरम्यान करिनाला सारा आणि कार्तिकच्या नात्यासंबंधी विचारणा करण्यात आली. त्यावेळी करिनाने, मला खरोखरंच त्याबाबत काही माहिती नाही, त्या दोघांपैकी कोणीही मला काहीही सांगितलं नाही असं करिना म्हणाली.

सारा आणि कार्तिक लवकरच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. सध्या, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन इम्तियाज अली दिग्दर्शित 'आजकल' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट २००९ साली आलेल्या सैफ अली खान-दीपिका पदुकोण स्टारर 'लव्ह आजकल' चित्रपटाचा रिमेक आहे. 'आजकल' १४ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.