''फोन बिझी येतोय नक्की काय चालू आहे तुझं?'' भर कार्यक्रमात नवऱ्याला विचारला प्रश्न

 कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाला लवकरच एक वर्ष पुर्ण होईल. 

Updated: Sep 8, 2022, 05:46 PM IST
''फोन बिझी येतोय नक्की काय चालू आहे तुझं?'' भर कार्यक्रमात नवऱ्याला विचारला प्रश्न title=

Katrina Kaif and Vicky Kaushal: कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाला लवकरच एक वर्ष पुर्ण होईल. बॉलीवूडमधील एक रोमॅण्टिक कपल सध्या सगळीकडे चर्चत आहे. इतकं की यांच्यातील छोट्या छोट्या गोष्टीही प्रचंड व्हायरल होत असतात. नुकताच असा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात विकीला कतरिनानं सवाल केला आहे. (bollywood actress katrina kaif suprises on vicky kaushal phone was coming busy for too long video goes viral)

कॉफी विथ करणचा (Coffee With Karan) हा सीझनही जबरदस्त व्हायरल होत आहे. आपल्या वैयक्तिक सेलेब्स शोमध्ये अनेक खुलासे करताना दिसतात. त्याचवेळी अशा अनेक गमतीजमती या शोमध्ये घडत असतात. तेव्हा नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडीओत कतरिना विकीला फोन लावते आहे पण विकीचा फोन बिझी येतो. 

करण जोहरच्या शोमध्ये कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर हे स्टारकास्ट म्हणजेच फोन भूत या चित्रपटाची स्टार कास्ट सामील झाली होती. एका गेम राऊंडदरम्यान कतरिना पती विकी कौशलला फोन करत होती. ज्यासाठी तिला काही पोईट्स मिळवायचे होते पण विकी सतत फोनवर दुसऱ्या कोणातरी बोलत होता. त्याचा फोन व्यस्त येत होता. यामुळे कतरिनाला राग आला. कतरिना म्हणाली- 'माझ्या पतीचा फोन व्यस्त आहे. काय चाललंय?

खूप प्रयत्न केल्यावर, जेव्हा विक्की फोन उचलतो, तेव्हा कतरिना त्याला म्हणते, 'विकी तुझ्यामुळे मी एक गुण गमावला. कारण तू फोन उचलत नव्हतास'' यानंतर कतरिना त्याला करण जोहरशी बोलायला लावते. करण विकीला विचारतो की, ''तू फोन का उचलला नाहीस''. यावर कतरिना इतकी चिडलेली दिसते की ती पुन्हा म्हणते- 'तुझा फोन व्यस्त होता, तू कोणाशी बोलत होतास?' यावर विकीनं उत्तर दिले की हा माझा पहिलाच कॉल होता. 

कतरिनाचा हा व्हिडिओही चाहत्यांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी नानाविध कमेंट्सही केल्या आहेत. 

कतरिनाचा फोन भूत हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट 7 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या आधी तो 15 जूलैला प्रदर्शित होणार होता. दोन कलाकारांसोबत कतरिना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.