मोरोक्कोमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीची धमाल

 थेट परदेशात जाऊन.... 

Updated: Jan 19, 2020, 03:08 PM IST
मोरोक्कोमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीची धमाल
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई :  एखादा चित्रपट, कार्यक्रम या साऱ्याचं सततचं चित्रीकरण, कामाचा व्याप आणि एकंदर दिनचर्या पाहता यातून काशीही उसंत मिळाल्यानंतर अनेकजण शहरी धकाधकीपासून दूर जाण्याला प्राधान्य देतात. कलाकार मंडळीही यापासून दूर नाहीत. सध्या अशीच एक अभिनेत्री थेट परदेशात जाऊन धमाल करताना दिसत आहे. सोशल मीडियावरही तिचे फोटो चांगलेच चर्चेत आहेत. 

आपल्या बोल्ड लूकने कायम प्रेक्षकांना घायाळ करणारी आणि सध्या #TravelGoals देणारी ही अभिनेत्री आहे, मलायका अरोरा. मलायका सध्या मोरोक्कोमध्ये काही आनंदाच्या क्षणांचा आस्वाद घेत आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटो पाहता हे स्पष्ट होत आहे. 

 
 
 
 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायकाने नुकत्याच पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या क्रोशेट ड्रेसमध्ये दिसत आहे. ज्याला तिने काळ्या रंगाच्या स्टॉकिन्सची आणि शूजची जोड दिली आहे. 'माय विकेंड राईड' असं कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केला आहे. 
इथे आठवड्याभराच्या कामाचा व्याप दूर सारत तुम्ही कुठे जाण्याचा प्लॅन करत असाल  आणि आता वेळ निघून गेल्याची खंत मनात असेल, तर मलायकाच्या विकेंडचे हे फोटो तुमची खंत काही क्षणांसाठी का असेना दूर सारेल असं म्हणायला हरकत नाही. 

 
 
 
 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायका तिच्या काही खास मैत्रीणींसोबतस मोरोक्कोमध्ये गेली आहे. जिथे ती खऱ्या अर्थाने प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. या महिन्यात मलायकाची ही दुसरी ट्रीप ठरत आहे. यापूर्वी तिने कुटुंब आणि प्रियकर अर्जुन कपूरसोबत गोव्यामध्ये नववर्षाचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं होतं.