close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अर्जुनशी लग्न करणार का?, मलायका म्हणाली....

मलायका- अर्जुन गेल्या बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. 

Updated: Apr 15, 2019, 04:42 PM IST
अर्जुनशी लग्न करणार का?, मलायका म्हणाली....

मुंबई : बी- टाऊनमध्ये एखाद्या कलाकाराच्या खासगी आयुष्याची चर्चा ही त्यांच्या कामाहून अधिक होते. सध्याच्या घडीला अशाच चर्चा रंगत आहेत अभिनेत्री, मॉडेल मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नात्याविषयी. मलायका- अर्जुन गेल्या बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. सुरुवातीचा काही काळ त्यांनी हे नातं सर्वांपासूनच लपवलं पण, आता मात्र विविध कार्यक्रमांपासून  घरगुती समारंभांपर्यंत ते एकमेकांची साथ देताना दिसत आहेत. इतकत नव्हे तर, १९ एप्रिलला गोव्यात एका खासगी विवाहसोहळ्यात ते लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. 

लग्नाच्या याच अफवांना आलेलं उधाण पाहता मलायकाने मात्र काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 'गोव्यात खासगी सोहळ्यातील लग्नसमारंभाच्या या फक्त आणि फक्त अफवाच आहेत. त्यातील काहीच खरं नाही', असं ती म्हणाली आहे. तिचं हे वक्तव्य ऐकता या जोडीच्या लग्नासाठी उत्सुक असणाऱ्या चाहत्यांची निराशा झाली आहे. मलायका सुरुवातीपासूनच तिच्या खासगी आयुष्याविषयी फार गोष्टी खुलेपणाने बोलत नसे. त्यातच या चुकीच्या चर्चांनाही आता तिने पूर्णविराम दिला आहे. तेव्हा आता त्यांच्या नात्याला येत्या दिवसांमध्ये नेमकं कोणतं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

अरबाज खान याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर मलायका आणि अर्जुनच्या नात्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या होत्या.  सुरुवातीचा काही काळ त्या दोघांनीही या नात्याविषयीच्या अनेक गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्या. पण, नंतर मात्र अर्जुन आणि मलायका विविध कार्यक्रम, फॅशन शो, डिनर डेट अशा ठिकाणी वारंवार एकत्र पाहिले गेले. एकंदरच त्यांनी अप्रत्यक्षपणे या नात्याची कबुलीच दिली. त्या दोघांच्या सोशल मीडिया पोस्ट पाहतासुद्धा ही बाब लक्षात येत आहे.