घरात फूट पाडणाऱ्या CAA, NRCचं समर्थन करत नाही; 'बॉर्डर' फेम अभिनेत्रीचं वक्तव्य

सत्ताधारी पक्षाने खऱ्या अर्थाने.... 

Updated: Jan 28, 2020, 11:40 AM IST
घरात फूट पाडणाऱ्या CAA, NRCचं समर्थन करत नाही; 'बॉर्डर' फेम अभिनेत्रीचं वक्तव्य  title=
घरात फूट पाडणाऱ्या CAA आणि NRCचं समर्थन करत नाही; 'बॉर्डर' फेम अभिनेत्रीचं वक्तव्य

मुंबई : सत्ताधारी पक्षाने खऱ्या अर्थाने देशातील देशातील नागरिकांना एकत्र आणलं आहे, असं वक्तव्य करत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी तिचं मत मांडलं. देशातील परिस्थितीवरही तिने भाष्य केलं. सोबतच CAA आणि NRCला आपला विरोध असल्याचं तिने स्पष्ट केलं. 

'परचम फाऊंडेशन' आणि 'वी द पीपल ऑफ महाराष्ट्र'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आपले विचार मांडणारी ही अभिनेत्री म्हणजे पूजा भट्ट. चित्रपट वर्तुळात असतानाही आपल्या आजूबाजूला सुरु असणाऱ्या घडामोडी आणि त्याचे होणारे परिणाम या सर्व गोष्टी पाहता पूजाने अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर तिचे विचार मांडले. 

'आपलं किंवा सरकारचं मौन राहणं कोणाच्याही बचावासाठी फायद्याचं ठरणार नाही. सत्ताधारी पक्षाने खऱ्या अर्थाने आपल्याला एकत्र आणलं आहे. एनआरसी आणि सीएएविरोधात निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थांनी जणू एकजुटीने आवाज उठवण्याची हीच वेळ असल्याचा संदेश दिला आहे. आता आपला आवाज अधिक स्पष्टपणे ऐकला जात नाही, तोवर थांबायचं नाही. मतभेद किंवा तीव्र मतप्रदर्शन हेसुद्धा राष्ट्रभक्तीचं एक स्वरुपच आहे', असं ती म्हणाली. 

देशातून येणारे हे आवज आपल्या नेतेमंडळींनी एकावेत असं मी जाणीवपूर्वक सांगू इच्छिते असं म्हणणाऱ्या पूजाने आपली ठाम मतं सर्वांपुढे ठेवली. माझ्या कुटुंबातच फूट पाडणाऱ्य़ा सीएए आणि एनआरसीचं मी समर्थन करत नाही ही बाब तिने अधोरेखित केली.