...म्हणून प्रियांकाने जोडीदार म्हणून केली निकची निवड

'हे' होते प्रियांकाचे #lifepartnergoals. 

Updated: Oct 30, 2018, 12:58 PM IST
...म्हणून प्रियांकाने जोडीदार म्हणून केली निकची निवड title=

मुंबई : सोशल मीडिया, कलाविश्वातील करिअर आणि खासगी आयुष्य या साऱ्यामध्ये योग्य तो समतोल राखणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच विवाहबंधनात आडकणार आहे. 

अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत ही 'देसी गर्ल' सहजीवनाची शपथ घेणार असून, त्याच्यासोबतच्या नात्याला तिने नेहमीच अगदी सुरेखपणे सर्वांमोर ठेवलं आहे. 

निक हा मुळात प्रियांकापेक्षा वयाने लहान आहे. असं असलं तरीही त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने 'देसी गर्ल'ला 'मिस्टर राईट' दिसला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

एक जोडीदार कसा असावा याविषयीचे बरेच निकष मुलींच्या मनात कर करुन असतात. किंबहुना त्याच निकषांवर मग जोडीदाराची निवड केली जाते. प्रियांकानेही अशाच काही कारणांमुळे निकची जोडीदार म्हणून निवड केली आहे. 
एका कार्यक्रमादरम्यान तिने जोडीदाराविषयीची संकल्पना स्पष्ट केली. 

एखाद्या मुलीच्या आयुष्यात येणाऱ्या त्याने तिचा आदर करावा. इथे तुमच्या कष्टांचा, प्रयत्नांचा आदर केला जाणं अतिशय महत्त्वाचं आहे, असं प्रियांका म्हणाली. 

'एखादी गोष्ट किंवा काम हे त्याच्यासाठी महत्त्वाचं असेल तर आपल्या जोडीदारासाठीची महत्त्वाच्या गोष्टी असतीलच. जोडीदाराचं मतही तितकच महत्त्वाचं असेल, असं समजून घेणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं ही भावनाच मुळात अतुलनीय आहे', असं प्रियांका म्हणाली. 

नात्यामध्ये असणारा विश्वास हा घटक अतिशय महत्त्वाचा असल्याचं सांगत त्याच बळावर हे नातं पुढे जात असतं असंही तिने आपल्या वक्तव्यातून सांगण्याचा प्रयत्न केला. 

'देसी गर्ल'च्या मनात प्रेम आणि नातेसंबंधांविषयी असणाऱ्या या अपेक्षा आणि संकल्पना पाहता निक तिचं मन जिंकण्यात सर्वतोपरी यशस्वी झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

मुळात या निकषांवरच तिने आपला जोडीदार म्हणून निकची निवड केली आहे.