तब्बल 62 दिवसांनंतर राज कुंद्रा कारागृहातून बाहेर; पाहा पहिला फोटो

62 दिवसांनंतर होणार घरवापसी; काय असेल शिल्पाची प्रतिक्रिया?

Updated: Sep 21, 2021, 12:11 PM IST
तब्बल  62 दिवसांनंतर राज कुंद्रा कारागृहातून बाहेर; पाहा पहिला फोटो

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणी गेल्या दोन महिन्यांपासून कारागृहात होता. तब्बल 62 दिवसांनंतर राज कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला आहे. अश्लील व्हिडीओ प्रकरणी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. 19 जुलै रोजी कुंद्राला रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान, कुंद्रासोबतच त्याचा साथीदार रायन थोरपे यालाही जामीन मिळाला आहे. 

राज कुंद्रा आता कारागृहातून बाहेर आला आहे. कारागृहातून बाहेर पडताचं राजचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये राजला टिळा लावल्याचं दिसून येत आहे. राज कुंद्रा अश्लील चित्रपटांप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलनं 1500 पानांची सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार या चार्जशीटमध्ये 43 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. 

महत्त्वाचं म्हणजे पतीला जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मोठ्या वादळानंतरही चांगल्या गोष्टी घडतात', असं लिहित शिल्पानं एक फोटो तिच्य़ा इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला. मुंबई उच्च न्यायालयाकडून सोमवारी राज कुंद्रा याला जामीन मंजूर करण्यात आला.