मुंबईत लवकरच सुरू होणार सनी लिओनी बाईंची शाळा

सनीला तिची मुलगी निशा हिच्यापासून शाळा काढण्याची प्रेरणा मिळाली

Updated: Aug 2, 2019, 09:28 AM IST
मुंबईत लवकरच सुरू होणार सनी लिओनी बाईंची शाळा title=

एकता सुरी, झी २४ तास मुंबई : लाखो चाहत्यांच्या दिल की धडकन असलेली अभिनेत्री सनी लिओनी ही मुंबईत चक्क शाळा सुरू करतेय. शाळेसाठी तिनं मुंबईतल्या जुहूत जागा निवडलीय. सनी लिओनी देशभरात शाळेच्या २५ शाखा काढणार आहे. लाखो चाहत्यांच्या दिल की धडकन असलेली अभिनेत्री सनी लिओनी.... मादक अदांनी घायाळ करणाऱ्या सनी लिओनींचा शिक्षकी पेशात प्रवेश करतेय. सनी लिओनी कोणत्या चित्रपटात शिक्षिकेची भूमिका करणार नाही, तर सनी लिओनी लहान मुलांसाठी खरोखरची शाळा काढणार आहे.

सनी लिओनी मुंबईतल्या जुहूमध्ये शिशुवर्ग सुरु करतेय. या शिशुवर्गात मुलांच्या कल्पकता आणि कलागुणांना वाव देणारे उपक्रम राबवण्यात येणार आहे.

सनीला मुलगी निशा हिच्यापासून शाळा काढण्याची प्रेरणा मिळाली. सनी लिओनी मुंबईसह देशातल्या २५ ठिकाणी शिशुवर्ग सुरू करणार आहे. सध्या या शिशुवर्गाच्या स्वरूप कसे असेल यावर सनी लिओनी काम करतेय. लवकरच सनीच्या शाळेच्या नावाचीही घोषणा होईल. 

घरात कडक शिस्तीची असल्याचं सनी सांगते. आता सनीच्या या शिशुवर्गात प्रवेश घेण्यासाठी मुलांपेक्षा त्यांचे पप्पाच जास्त उत्सुक असतील हे वेगळं सांगायला नको...