क्षणार्धात पैसे कमवण्यासाठी खिलाडी कुमार करतोय 'हे' काम

पत्नी ट्विंकल खन्ना हिचा खुलासा 

Updated: Jul 17, 2019, 08:26 AM IST
क्षणार्धात पैसे कमवण्यासाठी खिलाडी कुमार करतोय 'हे' काम

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार कधी काय करेल याचा काहीच नेम नाही. साहसी दृश्य म्हणून नका किंवा मग एखाद्या पुरस्कार सोहळ्यात किंवा कार्यक्रमात अचानकपणे भन्नाट प्रवेश करणं म्हणू नका. खिलाडी कुमार कायमच अनेकांचं लक्ष वेधतो. सध्याही बी- टाऊनचा हा 'बॉस' अशाच काही करामती करत आहे. ज्याचा खुलासा त्याच्या पत्नीने म्हणजेच अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना हिने केला आहे. 

ट्विंकलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार एका पोलला लटकल्याचं पाहायला मिळत आहे. 'हा येथे असाच लटकला आहे. फोर्ब्सच्या यादीत येऊनही त्याचं समाधान झालेलं नाही. आता त्याला लवकरात लवकर १०० पाऊंडचीही कमाई करायची आहे', असं कॅप्शन लिहित तिने खिलाडी कुमारची खिल्ली उडवली. 

कुटुंबासोबत काही खास क्षम व्यतीत करणाऱ्या खिलाडी कुमारने यंदाच्या वर्षी 'फोर्ब्स'च्या यादीत स्थान मिळवलं आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत समाविष्ट झालेला तो एकमेव भारतीय ठरला आहे. त्याचाच संदर्भ देत ट्विंकलने हे ट्विटही केलं. 

अक्षय आणि त्याचं कुटुंब सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. कामाच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत अक्षय कुमार कायमच त्याच्या कुटुंबाला प्राधान्य देतो. त्यामुळे हा अभिनेता खऱ्या अर्थाने कुचुंबवत्सलही आहे, असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, अक्षयच्या आगामी चित्रपटांविषयी सांगावं, तर रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' आणि 'मिशन मंगल' या मल्टीस्टारर चित्रपचटातून झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने 'मिशन मंगल'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला. यामध्ये, खिलाडी कुमारशिवाय विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी, नित्या मेनन आणि शर्मन जोशी हे कलाकारही झळकत आहेत. या चित्रपटांशिवाय 'हाऊसफुल्ल ४' आणि 'गुड न्यूज' या चित्रपटांतूनही तो झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे येत्या काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तो खऱ्या अर्थाने सज्ज आहे, असंच म्हणावं लागेल. 

.......................