...म्हणून ऐश्वर्या झाली बिग बींची सून, 'या' गोष्टीमुळं घेतला अभिषेकशी लग्न करण्याचा निर्णय़

 त्याचं ऐश्वर्याशी जुळलेलं नातं अनेकांना आश्चर्यचकित करुन गेलं.   

Updated: Aug 20, 2021, 05:57 PM IST
...म्हणून ऐश्वर्या झाली बिग बींची सून, 'या' गोष्टीमुळं घेतला अभिषेकशी लग्न करण्याचा निर्णय़  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन (aishwarya rai) ही जोडी बॉलिवूडमधील स्टार कपल्सच्या यादीतील एक नाव. शब्दांतही मांडता येणार नाही अशा सौंदर्याची देणगी लाभलेली ऐश्वर्या कारकिर्दीत एका उंचीवर होती, तर अभिषेकला मात्र कलाविश्वात कित्येकदा अपयशाचा सामना करावा लागला होता. असं असतानाही त्याचं ऐश्वर्याशी जुळलेलं नातं अनेकांना आश्चर्यचकित करुन गेलं. 

जोडीदार म्हणून अभिषेकची निवड करण्यामागेही काही कारणं होती. बच्चन कुचुंबाची सून आणि अभिषेकची पत्नी होण्यामागे नेमकी काय कारणं होती, याचा खुलासा खुद्द ऐश्वर्या राय बच्चन हिनंच एका मुलाखतीमध्ये केला होता. 

'वोग' मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिनं याचा उलगडा केला होता. 'अभी धाडसी, आणि नाईट इन शायनिंग आर्मर अशा पद्धतीचा व्यक्ती आहे. तो समजण्यास फार सोपा आहे, काहीसा वेंधळा आहे पण तितकाच धीटही आहे. आयुष्याला मनमुरादपणे कवेत घेणाऱ्यांपैकी तो एक आहे. त्याच्या याच स्वभावावर माझं प्रेम आहे. प्रत्येक वेळी कॅलरींचं गणित मोजणाऱ्या व्यक्तीसोबत मी राहू शकत नाही.' अशा शब्दांत एक जोडीदार म्हणून ऐश्वर्यानं अभिषेकचं (abhishek bachchan )  कौतुक केलं होतं. 

इथं फक्त 'इतक्या' रुपयांना विकत मिळतं 'बचपन का प्यार'

 

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांनी ऑनस्क्रिनही अनेकदा कपल्सच्या भूमिका साकारल्या. या जोडीच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. कलाविश्वातील कारकिर्दीसोबतच ही जोडी त्यांच्या खासगी आयुष्यालाही तितक्याच सराईतपणे सावरत असते. ज्यामुळं चाहत्यांच्या मनातही या जोडीसाठी आपुलकी आणि मानाचं स्थान आहे.