जान्हवी कपूरसोबतच्या नात्याबद्दल अर्जुन कपूरचा मोठा खुलासा

अभिनेता अर्जुन कपूर आजकाल त्याच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलतो.

Updated: Aug 1, 2021, 05:54 PM IST
जान्हवी कपूरसोबतच्या नात्याबद्दल अर्जुन कपूरचा मोठा खुलासा

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर आजकाल त्याच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलतो. तसंच नुकतच अर्जुनने सांगितलं की, सावत्र-बहीण जान्हवी कपूरसोबतचं त्याचे संबंध कित्येक वर्षात कसे बदलले आहेत. दोघेही चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची मुलं आहेत. अर्जुन आणि त्याची बहीण अंशुला बोनी यांच्या पहिल्या लग्नापासूनची पत्नी दिवंगत मोना शौरी यांची मुलं आहेत. जान्हवी आणि तिची बहीण खुशी कपूर ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या दुसऱ्या लग्नापासून बोनीची मुलं आहेत.

अर्जुन आणि जान्हवीने अलीकडेच एका मासिकेसाठी फोटोशूट केलं. दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुनने सांगितलं की, यापूर्वी जान्हवीसोबतचं त्यांचं नातं पूर्णपणे वेगळं होतं. अर्जुन म्हणाला की, 'तिथे पूर्वी शांतता असायची. आम्ही भेटायचो पण आमच्यात काही बोलणं व्हायचं नाही. या मुलाखतीत जान्हवी पुढे म्हणाली की, 'हे माझं कुटुंब आहे. मी माझ्या कुटुंबाकडून खूप काही शिकले आहे. आमचे वडील एक आहेत. आमचं रक्त एक आहे. '

जान्हवी पुढे म्हणाली, 'ही अशी गोष्ट आहे जी, कोणीही आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. असं नाही की, आपण दररोज एकमेकांच्या घरी जातो, किंवा एकमेकांच्या आयुष्याबद्दल प्रत्येक लहान गोष्ट जाणून घेतो. मला अर्जुन भैय्या आणि अंशुलासोबत सुरक्षित वाटतं. मला माहित आहे की, काहीही असलं तरीही ते एक माझे आधार आहेत. आणि मी माझ्या आयुष्यातील इतर कोणापेक्षाही अधिक आत्मविश्वासाने हे सांगू शकते.'

2018 मध्ये श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर अर्जुन वडील बोनी कपूरचा आधार बनला आहे. अलीकडेच, दिलेल्या मुलाखतीत अर्जुन म्हणाला की 'जर मी म्हणालो की, आम्ही एक परफेक्ट कुटुंब आहोत तर ते चुकीचं ठरेल. ही भिन्न विचारांची बाब नाही, आम्ही अजूनही स्वतंत्र कुटुंबं एकत्र बांधण्याचा प्रयत्न करीत आहोत.