शॉक लगा! दिवाळी आधीच बॉलिवूडकरांच्या घरी फुटले वीजबिलाचे फटाके

बॉलिवूडकरांची गोष्टच वेगळी 

Updated: Oct 27, 2021, 09:14 AM IST
शॉक लगा! दिवाळी आधीच बॉलिवूडकरांच्या घरी फुटले वीजबिलाचे फटाके

मुंबई : लाईट ही सगळ्यांचीच मूलभूत गरज आहे. मात्र भरमसाट लाईट बिल आलं की ते भरणं सर्वसामान्यांच्या जीवावर येतं. बिल कमी आलं तर सामान्य नागरिक खुश आणि जास्त बिल आलं तर वीज कंपनीला शिव्यांची लाखोली वाहतात. पण या सगळ्यांपासून बॉलिवूडकर मात्र दूर आहेत. त्यांची लाईट बिलांची रक्कम ऐकून तुमचा फ्यूज नक्की उडणार आहे.

पाहुया सेलिब्रिटींचं महिन्याला लाईट बिल नक्की असतं तरी  किती?

शाहरुख खानचं लाईट बिल महिन्याला 45 लाख 
सैफ अली खानच्या नुसत्या केबिनचं लाईट बिल  30 लाख 
सलमान खानचं लाईट बिल 25 लाख
आमिर खानच्या वांद्रयातल्या घराचं लाईट बिल 22 लाख
दीपिका पदुकोनचं महिन्याला  लाईट बिल 13 लाख 
कचरिना कैफचं लाईट बिल 10 लाख

कलाकारांच्या लाईट बिला एवढं सामान्यांच 10 वर्षांचं बजेट

सलमान खान – दबंग सलमान खानच लाईट बिल हे त्याच्यासारखंच दबंग आहे. तो महिन्याला 25 लाख रुपये लाईट बील भरतो.

कतरीना कैफ – मुंबईत राहणारी कतरीना महिन्याला 10 लाख रुपये लाईट बिल भरते.

दीपिका पदुकोन – तर बॉलिवूडच्या पद्मावतीला महिन्याला 13लाख रुपये लाईट बिल येतं.

आमिर खान – वांद्रयाला राहणाऱ्या आमिरचं महिन्याचं लाईट बिल 22 लाख रुपये आहे.

सैफ अली खान – तर सैफच्या नुसत्या केबिनचं लाईट बिल महिन्याला 30 लाख रुपये आहे

शाहरुख खान – तर शाहरुखचं महिन्याचं लाईट बिल 45 लाख रुपये आहे.

बॉलिवूडकरांचं  भरमसाट लाईट बिल चर्चेचा विषय बनला आहे. या बिलांची रक्कम ऐकून सर्वसामान्यांचा ‘फ्यूज’ उडेल. सर्वाधिक लाईट बिलात शाहरुख खान अव्वल असल्याचं आढळून आलं आहे. या कलाकारांच महिन्याला लाखो रुपयांचं लाईट बिल आहे.