'तू किती....', चारचौघात मलायका कोणावर संतापली?

ती जिथं जाईल तिथं चाहत्यांचा गराडा पाहायला मिळाला.   

Updated: Jun 16, 2022, 09:19 AM IST
'तू किती....', चारचौघात मलायका कोणावर संतापली?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

Malaika Arora Video: अभिनेत्री मलायका अरोरा हिनं कायमच तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. एक पिढी लहानाची मोठी झाली. पण, मलायकाच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाची एकही सुरकुती आली नाही असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

लग्न, बाळंतपण, घटस्फोट आणि आता अभिनेता अर्जुन कपूर याच्याशी असणारं रिलेशनशिप या सर्व गोष्टींमुळं मलायका सातत्यानं चर्चेत राहिली. ती जिथं जाईल तिथं चाहत्यांचा गराडा पाहायला मिळाला. 

हल्लीसुद्धा असंच झालं. पण, यावेळी मात्र तिच्या चेहऱ्यावर काहीसा संतापही दिसला. जीममधून बाहेर निघालं असता काही चाहत्यांनी मलायताच्या भोवती गर्दी करण्यास सुरुवात केली. 

तिच्यासोबत एक फोटो काढायला मिळावा हीच काय ती त्यांची इच्छा. मलायकाशी फोटो काढण्यासाठी म्हणून ते पुढे आले. त्यातलाच एक पुन्हा पुन्हा पुढे येत असल्याचं पाहून आता तर फोटो काढलास अरे तू... असं म्हणत तिनं नाराजी व्यक्त केली. 

फोटो व्यवस्थित आला नाही, म्हणून परत फोटो काढण्यासाठी जेव्हा हा चाहता तिला विनंती करतो तेव्हा ती त्यासाठी तयारही होताना दिसत आहे. 

मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक फॅशनपेजवरही शेअर करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.