मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'वॉर' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर चांगल्या वेगाने पुढे जात असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या या चित्रपटाने चार दिवसांमध्ये १२४ कोटींचा गल्ला जमवला आहे. ज्या अर्थी हृतिक आणि टायगर या दोघांच्याही करिअरमध्ये सर्वाधिक कमाई करण्यासाठी म्हणून या चित्रपटाकडे पाहिलं जात आहे.
आतापर्यंत पहिल्या चार दिवसांत इतकी कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'वॉर'ने दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. मुख्य म्हणजे सलमानची मुख्य भूमिका असणाऱ्या 'भारत'लाही 'वॉर'ने मागे टाकलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार शनिवारी या चित्रपटाच्या कमाईत २८ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीही 'वॉर'च्या कमाईच्या आकड्यांनी १०० कोटींचा आकडा ओलांडल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं होतं. विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कामगिरीने सर्वांना धक्काच बसला आहे.
#War benchmarks...
Fifth #YRF film to cross cr in 3 days, after #Dhoom3, #Sultan, #TZH and #TOH.
#Highest grossing *first 3 days* for #HrithikRoshan, #TigerShroff and director #SiddharthAnand.#India biz.— taran adarsh (@taran_adarsh) October 5, 2019
'वॉर'ने रचले 'हे' विक्रम...
गांधी जयंती दिवसांमध्ये प्रदर्शित झालेल्या आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी 'वॉर' एक ठरत आहे.
नवरात्रोत्सवामध्ये सर्वाधिक कमाई आणि टायगर श्रॉफच्या कारकिर्दीत पहिल्या तीन दिवसांमध्ये विक्रमी करणाऱ्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'वॉर'.
'धूम ३', 'सुलतान', 'टायगर जिंदा है' आणि 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटांमागोमाक दमदार कमाई करणारा आणि याच निर्मिती संस्थेअंतर्गत साकारला जाणारा 'वॉर' हा पाचवा चित्रपट ठरत आहे. त्यामुळे आता येत्या काळात टायगर, हृतिकचा हा वॉर आणखी किती कमाई करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.