कॅमेरा वळताच अजय देवगण.., सर्वात उद्धट सेलिब्रिटी कोण? त्याने मधलं बोट..; धक्कादायक खुलासे

Shares Shocking Insights About Bollywood Celebrities: सोशल मीडियावर सेलिब्रिटींकडून घेतल्या जाणाऱ्या 'आस्क मी' या रंजक संवादादरम्यान करण्यात आले धक्कादायक खुलासे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 24, 2024, 09:18 AM IST
कॅमेरा वळताच अजय देवगण.., सर्वात उद्धट सेलिब्रिटी कोण? त्याने मधलं बोट..; धक्कादायक खुलासे title=
एका प्रसिद्ध फोटोग्राफरने केली पोलखोल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध फोटोग्राफर म्हणजेच पापाराझी असलेल्या विरेंद्र चावलाने सोशल मीडियावरुन प्रसिद्ध अभिनेत्यांबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. देशभरातील तरुणाईला आकर्षक असलेल्या मनोरंजनसृष्टीमधील कलाकार खरोखर कसे आहेत याबद्दलचा खुलासा करताना विरेंद्रने थेट नावं घेऊन काही मोठे खुलासे केले आहेत. आपल्या चाहत्यांबरोबर 'आस्क मी एनिथिंग' म्हणजेच मला काहीही विचारा असं एक सेशन विरेंद्रने सोशल मीडियावर घेतलं. 

तापसी सर्वात उद्धट

या सेशनदरम्यान विरेंद्रला चाहत्यांनी वेगवेगळ्या कालाकारांबद्दल, प्रसंगांबद्दल विचारलं. त्यावर भाष्य करताना विरेंद्रने तापसी पन्नू ही फार अगाऊपणे वागते असं म्हटलं आहे. तसेच अभिनेता करन सिंह ग्रोव्हरने एकदा माझ्या टीमच्या फोटोग्राफर्सला मधलं बोट दाखवून त्यांचा अपमान केलेला, असं विरेंद्रने म्हटलं आहे. रेडीटवरील आस्क मी सेशनमध्ये विरेंद्रला चाहत्यांनी बरेच प्रश्न विचारले. तू पाहिलेला सर्वात रुड म्हणजेच अगाऊपणे, उद्धटपणे वागणारा सेलिब्रिटी कोण? असा प्रश्न विचारण्यात आला.

या प्रश्नाला उत्तर देताना पुढचा मागचा फार विचार न करता विरेंद्रने तापसी पन्नूचं नाव घेतलं. विरेंद्रला तुला ज्यांचे फोटो काढायला आवडतात असे सेलिब्रिटी कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, "रणवीर सिंह, रणबीर कपूर, दीपिका, करिना यांचे फोटो काढायला मला फार आवडतं. तर सर्वात नावडत्यांमध्ये तापसी आणि जया बच्चन यांचं नाव घेईन," असं म्हटलं.

मधलं बोट दाखवलं

तसेच असा कोणता अभिनेता आहे तो कॅमेरा बंद केल्यानंतर अगदीच वेगळा वागतो? असा प्रश्नही विरेंद्रला विचारण्यात आला. त्यावर विरेंद्रने, "अजय देवगण" असं उत्तर दिलं. मात्र नंतर त्याने ही प्रतिक्रिया डिलीट केली. विरेंद्रने अभिनेता करण सिंह ग्रोव्हरसंदर्भातही एक किस्सा सांगितला. "एकदा करण सिंह ग्रोव्हरने जीमबाहेर पाडताना माझ्या टीममधल्या एका कॅमेरामनला मधलं बोट दाखवलं होतं. आम्ही तो फोटो पोस्ट केला नव्हता कारण त्याच्या टीमने आम्हाला कॉल करुन हा फोटो पोस्ट न करण्याची विनंती केली होती," असं रविंद्रने सांगितलं.

नक्की वाचा >> Video: 'ती फार माज दाखवते!' एअर होस्टेसकडून अभिनेत्रीची पोलखोल; खरा चेहरा आणला समोर

हा अभिनेता सहज नजरेस पडत नाही

विरेंद्रने फोटोग्राफर्सच्या तिसऱ्या डोळ्यात म्हणजेच कॅमेरात सहज न कॅप्चर होणारा आणि शहरात सहज न दिसणारा अभिनेता कोणता याबद्दल बोलताना शाहरुख खानचं नाव घेतलं. शाहरुख सहज फोटोग्राफर्सला सापडत नाही. तसेच त्याच्या फोटोंसाठी सर्वाधिक पैसे मिळतात, असं विरेंद्र म्हणाला.

हे कलाकार चांगली वागणूक देतात

रणवीर सिंह, कार्तिक आर्यन, सारा अली खान आणि जान्हवी कपूर हे सारे कलाकार फोटोग्राफर्सबरोबर अगदी प्रेमाने वागतात. अगदी कॅमेरा बंद असेल तर यांच वागणं फार प्रेमळ आणि सहकार्याचं असतं असं विरेंद्र म्हणाला. तसेच संजय दत्त आणि श्रद्धा कपूर हे अनेकदा फोटोग्राफर्सला मदत करतात असंही विरेंद्रने सांगितलं.