प्रियांकाकडून पतीला खास गिफ्ट, पाहून तुम्हीही म्हणाल 'बस्स इतना सा ख्वाब है....'

करिअरमध्ये स्थैर्य आल्यानंतर प्रियांकानं विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय़ घेतला 

Updated: Sep 17, 2021, 10:08 AM IST
प्रियांकाकडून पतीला खास गिफ्ट, पाहून तुम्हीही म्हणाल 'बस्स इतना सा ख्वाब है....'
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई :  अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख प्रस्थापित केल्यानंतर ही 'देसी गर्ल' बॉलिवूडमध्ये नाव कमवण्यासाठी गेली. पाहतापाहता प्रसिद्धीझोतात आली आणि जागतिक स्तरावर तिचं नाव पोहोचलं. करिअरमध्ये स्थैर्य आल्यानंतर प्रियांकानं अमेरिकन गायक निक जोनास याच्याशी लग्नगाठ बांधली. 

निक आणि प्रियांका यांचं नातं कायमच चाहत्यांना कपल गोल्स देत आलं आहे. एकमेकांच्या जीवनातील खास प्रसंग असो किंवा कुणा एकाच्या वाट्याला आलेलं यश साजरा करणं असो. ही जोडी कधीही कुठंही कमी पडलेली नाही. निकच्या वाढदिवसाच्या वेळी पुन्हा एकदा याची प्रचिती येत आहे. 

निकच्या वाढदिवसानिमित्त प्रियांकानं अतिशय खास अंदाजात त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. कामानिमित्तानं ती बऱ्याच दिवसांपासून लंडनमध्ये होती. पण, आता मात्र निकच्या वाढदिवसानिमित्त त्याला वेळ देण्यासाठी म्हणून ती अमेरिकेत आली. पेन्सेल्वेनियातील फर्मिंगटन येथे तिनं निकचा वाढदिवस साजरा केला. पतीसोबतचा सुरेख फोटो शेअर करत प्रियांकानं त्याला शुभेच्छा दिल्या. 

फोटोमध्ये प्रियांका निकला पाठीमागून मिठी मारताना आणि किस करताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये ती लिहिते, 'माझं आयुष्यभराचं प्रेम.... अतिशय भावनिक अशा या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुझ्यावर खूप सारं प्रेम करते. तुझ्या याच अस्तित्वासाठी धन्यवाद....'

कामात कितीही व्यग्र असूनही प्रियांकानं निकसाठी दिलेला हा वेळ आणि त्याच्या आनंदासाठी केलेली मेहनत हे सारंकाही पाहता या जोडीचा सर्वांनाच हेवा वाटत आहे. नकळतच अनेकांनी मनोमनी आपल्यालाही इतकंच प्रेम करणारा जोडीदार मिळावा अशी इच्छाही व्यक्त केली असेल..... हो ना?