मुंबई : बॉलिवूड म्हणजे झगमगाट. अभिनयासोबतच बॉलिवूडची एक वेगळी बाजू आहे ती म्हणजे तेथील पार्ट्या. बॉलिवूडच्या पार्ट्या खूप चर्चेचा विषय असतो. परदेशी दारू आणि गॉसिप असं या पार्ट्यांचा एक फॉरमॅट असतो. पण आता ही पद्धत बदलताना दिसते. बॉलिवूड कलाकार आपल्या कामाकडे अधिक लक्ष देतात. त्याबरोबरच आपली प्रतिमा सांभाळताना दिसतात. असं असताना अनेक कलाकार असे आहेत जे अद्यापही मद्यपान करत नाहीत.
शिल्पा शेट्टी - बॉलिवूडमध्ये योगागर्ल शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठी लोकप्रिय आहे. अलिकडेच शिल्पाने नॉन व्हेज खाणं सोडून दिल्याचं देखील बोलण्यात आलं. तसेच मद्यपान आणि धुम्रपानही करत नाही.
अमिताभ बच्चन - बॉलिवूडमधील शहनशाह बिग बी देखील आरोग्याची खूप काळजी घेतात. ते स्वतः मद्यपान करत नाही.
जॉन अब्राहम - अभिनयासोबतच फिटनेसमुळे कायमच चर्चेत असलेला अभिनेता जॉन अब्राहम. जॉनचा वर्कआऊट अतिशय चर्चेत आहे. महत्वाचं म्हणजे ड्रिंक्स आणि स्मोकिंग देखील जॉन करत नाही.
अक्षय कुमार - खिलाडी कुमार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार. वक्तशीरपणामुळे ओळखले जाणारा अक्षय पहाटे लवकर उठून वर्कआऊट करत नाही. तो रात्री ७ वाजेपर्यंत जेवण घेतो. महत्वाचं म्हणजे अक्षय मद्यपानही करत नाही.
परिणिती चोप्रा - अभिनयासोबत आपल्या रोखठोक बोलण्यामुळे चर्चेत येणारी परिणिती कधीच मद्यपान करत नाही.
सोनाक्षी सिन्हा - फिटनेस जपण्यासाठी सोनाक्षी मद्यपान आणि धुम्रपान करत नाही.
सिद्धार्थ म्हलोत्रा - शेरशाह फेम सिद्धार्थ मद्यपान आणि धुम्रपान करत नाही.
दीपिका पदुकोण - दीपिका स्वतःची काळजी खूप घेते. मद्यपानापासून दीपिका स्वतःला लांब ठेवते.