पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडमधून तीव्र संताप

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले असून 20 हून अधिक जखमी झाले आहेत.

Updated: Feb 15, 2019, 09:04 AM IST
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडमधून तीव्र संताप  title=

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाचे वातावरण पसरले आहे. हल्ल्यात आतापर्यंत 40 हून अधिक जवान मारले गेले तर अनेक 20 हून अधिक जखमी झाले आहेत. सीआरपीएफच्या 2500 जवानांचा ताफा श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने जात होता. त्याचवेळी जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून भरलेल्या स्फोटकांनी हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. देश-विदेशातून, राजकीय नेत्यांपासून ते बॉलिवूडच्या अनेक कलाकारंनी या हल्ल्याची निंदा केली आहे.

बॉलिवूड कलाकार अक्षय कुमार, सलमान खान, अभिषेक बच्चन. अजय देवगण, अनुपम खेर, मधुर भांडारकर, रितेश देशमुख यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. 

 

काश्मीरमध्ये इतिहासातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे. दहशतवादी अदिल अहमद स्फोटकांनी भरलेली गाडी घेऊन आला. अदिल २०१८ मध्ये जैश-ए-मोहम्मदला सामील झाला. अदिलने १०० किलो स्फोटकांनी भरलेली गाडी बसवर धडकवली. या दहशतवादी हल्ल्याला जशाच-तसे उत्तर द्यावे अशी मागणी देशभरातून करण्यात येत आहे.