काय, बोमन ईरानी व्हीलचेअरवर?''

बोमन ईरानी लोकप्रिय अभिनेता 

काय, बोमन ईरानी व्हीलचेअरवर?'' title=

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता बोमन ईरानी यांच्या अभिनयाचे लोक वेडे आहेत. बोमन ईरानी असे अभिनेते आहेत ज्यांनी वयाच्या 40 व्या वर्षी अभिनय करायला सुरूवात केली. हल्लीच बोमन ईरानी हैद्राबादला गेले होते. तिथून त्यांनी आपल्या ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ते व्हिलचेअरवर दिसत आहे. या फोटोतून त्यांनी आपल्या चाहत्यांना हे सांगितलं आहे की, त्यांना गुडघ्यांचा त्रास होत आहे. 

बोमन ईरानी यांनी आपल्या या फोटोला उत्तम कॅप्शन देखील दिली आहे. त्यांनी या कॅप्शनमध्ये जेट एअरवेजला टॅग करताना लिहिलं आहे की, हुसैन आणि श्रीनिवास यांचे आभार. हैद्राबादवरून परत येतावा हुसैनने माझी खूप मदत केली. तो जेट एअरवेज फ्लाइटमधून हैद्राबादवरून मुंबईला येत होते.

नंतर बोमन ईरानी यांनी सांगितलं की, त्यांना स्लिप डिस्कचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना चालण्यात त्रास होत आहे. तर दुसरीकडे चाहते ईरानी यांच्या तब्बेतीत लवकर सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करत आहे. बोमान ईरानी यांना खूप त्रास होत असल्यामुळे चालण्यामध्ये देखील समस्या निर्माण होत आहे.