कंगना राणौतला तूर्तास दिलासा; अटक नाही, पण...

जाणून घ्या काय म्हणालं न्यायालय   

Updated: Nov 24, 2020, 05:11 PM IST
कंगना राणौतला तूर्तास दिलासा; अटक नाही, पण...  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणी अभिनेत्री Kangana ranaut कंगना राणौत हिला दिलासा मिळालेला आहे. bombay high court मुंबई उच्च न्यायालयानं कंगना आणि तिची बहीण rangoli chandel रंगोली चंदेल यांची अटक तूर्तास होऊ नयेत असे आदेश दिले आहेत. 

न्यायालयानं हा निर्णय दिला असला तरीही, 8 जानेवारीला मात्र त्या दोघींनाही मुंबई पोलिसांपुढं हजर व्हावं लागणार आहे. 

 

नेमकं प्रकरण काय? 

बॉलिवूडमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून सतत अनेक वादांमुळं चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत आणि बहीण रंगोली चंदेलनं सोमवारीच मुंबई उच्च न्यायालात एक याचिका दाखल कोली होती. आपल्या नावे मुंबई पोलिसांनी दाखल केलेली एफआययआर रद्द करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळं कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करत धार्मिक तणाव निर्माण करण्याचा आरोप एफआयआरच्या माध्यमातून करण्यात आला होता.