LAL SINGH CHADDHA UPDATES:लाल सिंग चड्ढा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळालेला थंड प्रतिसाद पाहून या चित्रपटाचे शो रद्द झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. बऱ्याच चित्रपटगृहांमध्ये शंभर ते दोनशे सीट्सवर केवळ दहा ते वीस प्रेक्षकच चित्रपटगृहांमध्ये होते. लाल सिंग चड्ढा सिनेमा बनवण्यासाठी लागणारे सर्व पैसे वॉयकॉम18(VIOCOM18) स्टूडियोज आणि पॅरामाउंट पिक्चर्सने लावले आहेत.आमिर खानने (AAMIR KHAN) सिनेमातील त्याचं मानधन आणि फिल्मसाठी जो खर्च आलाय तो आधीच घेऊन ठेवलाय. त्यामुळे जर सिनेमाचं नुकसान झालं तर त्याचा फटका सरळ सरळ वॉयकॉम18 स्टूडियोजना होणार आहे.
सोशल मीडियावर लालसिंग चड्ढा(LAL SINGH CHADDHA) सिनेमावर बहिष्कार टाकणाऱ्या बऱ्याच जणांपैकी अर्ध्यांना हेही माहित नसेल कि वॉयकॉम18 स्टूडियोजचे सर्व अधिकार मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायंस इंडस्ट्रीजकडे(RELIENCE) आहे. म्हणजे लाल सिंग चड्ढाचा बहिष्कार(BOYCOTT LALSINGH CHADDHA) करून लोकांनी आमिर खानचं नाही तर मुकेश अंबानींचं नुकसान केलयं .यात आमिरचा तोटा नाहीच आहे.
‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमा बनवणारी भारतीय कंपनी वॉयकॉम18 मीडिया प्राइवेट लिमिटेड मुंबईमध्ये आहे. रिलायंस समूह सिनेमांसंबंधी सर्व गोष्टी पाहते जियो स्टूडियोज(JIO STUDIOS) ची सीईओ ज्योति देशपांडे आता वॉयकॉम18 च्या देखील सीईओ आहेत ज्या लाल सिंग चड्ढा सिनेमाच्या निर्मत्यांपैकी प्रमुख आहेत
VIOCOM18चा लाल सिंग चड्ढाच नाही तर, १२ जुलैला आलेला शाब्बास मिथू(SHABBAS MITHU) हा सिनेमादेखील बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही त्यामुळे जर लाल सिंग चड्ढाच कलेक्शन हवं तसं झालं नाही आणि हाही सिनेमा फ्लॉप ठरला तर वॉयकॉम18 चा हा दुसरा सिनेमा असेल जो फ्लॉप होतोय.