कलाविश्वावर कोरोनाचं सावट कायम; ज्येष्ठ विनोदवीराचा मृत्यू

अनोख्या व्यक्तीमत्त्वाने आणि विनोदी शैलीने त्यांनी कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली होती

Updated: Apr 13, 2020, 01:58 PM IST
कलाविश्वावर कोरोनाचं सावट कायम; ज्येष्ठ विनोदवीराचा मृत्यू
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : coronavirus चा प्रादुर्भाव अत्यंत भीतीदायक पद्धतीने साऱ्या जगाताल विळखा घालत असतानाच कलाविश्वावरही त्याचं सावट पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आपल्या प्राणांना मुकावं लागलं आहे. अशा कलाकारांमध्ये आणखी एका ज्येष्ठ कलावंतानेही मनाला चटका लावणारी एक्झिट घेतली आहे.

कोरोनामुळे निधन झालेल्या या ज्येष्ठ विनोरवीराचं नाव आहे, टीम ब्रूक टेलर. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बीबीसी रेडिओवर ते कायमस्वरुपी पॅनलिस्टही होते. जवळपास चाळीस वर्षांसाठी त्यांनी ही भूमिका बजावली होती. ७० च्या दशकात 'द गुडीज'  या कार्यक्रमामुळे ते टेलिव्हिजन विश्वात कमालीचे लोकप्रिय झाले होते. 

केंब्रिज युनिव्हर्सिटीतून या ब्रिटीश विनोदवीराने अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. "At Last The 1948 Show" या कार्यक्रमाचाही ते एक भाग होते. ज्यामध्ये ते जॉन क्लीस आणि ग्रॅहम चॅपमन यांच्यासमवेत झळकले होते. 

 

आपल्या अनोख्या व्यक्तीमत्त्वाने आणि विनोदी शैलीने त्यांनी कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अतिशय मनमिळाऊ असण्यासोबतच त्यांची  विचारसरणी कायमच आकर्षणाचा मुद्दा ठरत असत. टीम यांच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांसमवेत कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी दु:ख व्यक्ती केलं आहे. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजलीही वाहिली.