बकेट लिस्ट : 'तू परी' हे गाणं लाँच करून दिलं माधुरीने दिलं खास गिफ्ट

वाढदिवसादिवशी दिलं खास गिफ्ट 

Updated: May 15, 2018, 08:37 PM IST

मुंबई : माधुरी दीक्षित 'बकेट लिस्ट'या सिनेमांतून मराठीत पदार्पण करत आहे. या सिनेमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. मंगळवारी 15 मे रोजी धक धक गर्लने आपला 51 वा वाढदिवस साजरा केला. या दिवशी माधुरीला वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा आल्या. चाहत्यांनी माधुरीचा वाढदिवस अगदी खास केला. त्या चाहत्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून माधुरीने आपल्या सिनेमाचं दुसरं गाणं 'तू परी' लाँच झालं आहे. 

तू परी हे सुमित राघवनसोबतच रोमँटिक साँग सध्या खूप चर्चेत आहे. या गाण्यात माधुरी आणि सुमितचं सुंदर नातं खुलतं आहे. हे गाणं श्रेया घोशाल आणि रोहन प्रधान यांनी गायलं आहे. या सिनेमाचे फिल्ममेकर करण जोहर यांनी हे गाणं ट्विट करून माधुरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

करण जोहरने माधुरीसाठी 2 ट्विट केले आहेत. यात करण जोहरने माधुरी आणि रेणुका शहाणेसोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये माझ्या हम आपके है कोण या सिनेमातील खास क्षण अशी पोस्ट लिहून शेअर केलं आहे. 

'बकेट लिस्ट' हा सिनेमात सामान्य कुटुंबातील स्त्रीवर आधारित आहे. जीच्या अनेक इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिल्या आहेत. रोजच्या जीवनांत ती स्वतःसाठी कोणकोणत्या गोष्टी विसरत चालली आहे हे या सिनेमांत दाखवलं आहे. तेजस प्रभा आणि विजय देऊसकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.