ही तर हद्द झाली....; दीपिकावर नेटकरी संतापले

कारण ठरतंय ते म्हणजे.... 

Updated: Jan 19, 2020, 06:13 PM IST
ही तर हद्द झाली....; दीपिकावर नेटकरी संतापले
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासून तिच्या Chhapaak या बॉलिवूड चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे. दीपिकाच्या या चित्रपटाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. पण, तरीही दीपिका मात्र तिच्या वतीने शक्य त्या सर्व परिंनी या चित्रपटाला सर्वांपर्यंत पोहोचवू इच्छित आहे. याच दरम्यान, सोशल मीडियावर मात्र सध्या दीपिकाच्या विरोधात आवाज उठवला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. याला कारण ठरतंय ते म्हणजे दीपिका पदुकोणचा एक टीकटॉक व्हिडिओ. 

चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सहसा कलाकार आणि चित्रपटाच्या टीमकडूनही विविध तंत्रांचा अवलंब केला जातो. याचाच एक भाग म्हणून दीपिकाने Chhapaakच्या प्रसिद्धीसाठी TikTok चॅलेंज सुरु केलं. ज्यामध्ये तिने आपल्या तीन आवडत्या लूकशी संबंधित टीकटॉक व्हिडिओ पोस्ट करण्यातं आव्हान फॅबी नावाच्या मेकअप आर्टीस्टला गिलं. पण, यावेळी मात्र दीपिकाची ही कृती अनेकांनाच खटकली. 

वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी

फॅबीला चॅलेंज देत असताना दीपिकाने 'ओम शांती ओम', 'पिकू' आणि 'छपाक' या तीन चित्रपटांतील लूक रिक्रिएट करण्यास सांगितलं. अर्थात फॅबीने ते केलंही. पण, चित्रपटातून दाखवण्यात आलेल्या एका संवेदनशील मुद्द्याकडे अशा प्रकारे पाहणाऱ्या दीपिकाचा हा अंदाज मात्र अनेकांना पटला नाही. 

Chhapaak 'छपाक' या चित्रपटात दीपिकाने मालती या ऍसिड हल्ला प़ीडितेची भूमिका साकारली आहे. जिच्याप्रमाणे लूक करण्यास सांगणाऱ्या या अभिनेत्रीवर अनेकांनी आगपाखड केली आहे. तिची ही कृती अमानवी असल्याचं म्हणत अनेकांनीच तिच्यावर तोफ डागली आहे. ही तर हद्द झाली, असं म्हणतही दीपिकावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. चेहऱ्यावर व्रण, जखमा असणं हा लूक नाही अशा शब्दांतही तिला काहींनी खडसावलं.