प्रसिद्ध कोरियोग्राफरचं निधन, सोनू सुद मदतीसाठी धावला पण...

प्रसिद्ध कोरियोग्राफरच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का...  

Updated: Nov 29, 2021, 09:17 AM IST
प्रसिद्ध कोरियोग्राफरचं निधन, सोनू सुद मदतीसाठी धावला पण...

मुंबई : प्रसिद्ध कोरिओग्राफर शिवा शंकर मास्टर यांचं निधन झालं आहे. ते 72 वर्षांचे होते. त्यांना कोरोना (COVID 19) ची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना हैदराबादच्या IG रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अशा परिस्थितीत बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने, शिव शंकर यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. धक्कादायक म्हणजे शिव शंकर यांच्यासोबतच त्यांच्या मुलाला देखील कोरोनाची लागण झाली होती. 

शनिवारी रात्री शिव शंकर यांची प्रकृती ढासळू लागली, त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले, जिथे त्यांनी रविवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. शिवशंकर यांच्या निधनामुळे दक्षिण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.

महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे उपचार मिळू शकत नसल्याची बातमी कळाल्यावर सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला. सोनू म्हणाला, 'शिवशंकर मास्टरजी यांच्या निधनाची बातमी ऐकून अतिशय दु:ख झालं. आम्ही त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण देवाने काही वेगळेच ठरवले होते. मास्टरजींना आपण सदैव लक्षात ठेवू. हे दु:ख सहन करण्याची ईश्वर त्यांच्या कुटूंबियांना शक्ती देवो.'

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते शिव शंकर 
शिवा शंकर हे दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर होतो. शिवशंकर अनेक वर्षांपासून दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करत होते. 'मगधीरा'मधील 'धीरा-धीरा' हे गाणेही त्यांनी कोरिओग्राफ केले. नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.