त्या दृश्यम पेक्षा आणखी जास्त सस्पेन्स ‘दृश्यम 2’मध्ये, आणि अजयच्या अभिनयाच्या जादूचा अनुभव

अभिनेता अजय देवगनच्या  चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 

Updated: May 4, 2021, 03:42 PM IST
त्या दृश्यम पेक्षा आणखी जास्त सस्पेन्स ‘दृश्यम 2’मध्ये, आणि अजयच्या अभिनयाच्या जादूचा अनुभव

मुंबई : मल्याळम सुपरहिट‘दृश्यम 2’ (Drishyam 2) चित्रपटाबद्दलंच क्रेझ अद्यापही चाहत्यांच्या डोक्यात आहे.  आता अभिनेता अजय देवगनच्या  चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  चित्रपटाला भरभरून यश मिळाल्यानंतर  ‘दृश्यम 2’ लवकरचं चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाबद्दल अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे.  चित्रपटाचे हिंदी राईट्स विकत  घेतले असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 

तरण आदर्श म्हणाले, 'कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांचं प्रॉडक्शन हाउस 'पनोरमा स्टूडियोज इंटरनेशनल’ ने ‘दृश्यम 2’ चित्रपटाचे रीमेक  राइट्स विकत घेतले आहेत. लवकरचं दिग्दर्शक आणि कास्टबद्दल घोषणा करण्यात येईल.' असं सांगण्यात येत आहे त्यामुळे अजयच्या चाहत्यांना ‘दृश्यम 2’मध्ये अभिनयाची जादू पुन्हा अनुभवता येणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सांगायचं झालं तर. 2015 साली 'दृश्यम 2' चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल झाला होता. चित्रपटात अजय देवगनसोबत अभिनेत्री तब्बू देखील मुख्य भूमिकेतं झळकली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीचं मजल मारली होती.