हुबेहूब आमिर खानसारखा दिसणारा दुसरा परफेक्शनिस्ट; मलिकांमध्ये करतो काम

बॉलिवूड सेलिब्रिटींसारखे दिसणारे चेहरे कायम चर्चेत असतात. 

Updated: May 25, 2021, 03:22 PM IST
हुबेहूब आमिर खानसारखा दिसणारा दुसरा परफेक्शनिस्ट; मलिकांमध्ये करतो काम

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींसारखे दिसणारे चेहरे कायम चर्चेत असतात. बॉलिवूडचे खान शाहरूख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्यासारखे दिसणारे चेहरे सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सारखाचं दिसणारा देवाशीष घोष सोशल मीडिया कायम ऍक्टिव्ह असतो. तो कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. शाहरूखसारखा  दिसणारा व्यक्ती बक्कळ पैसे कमावतो. पण  देवाशीष घोषला पैसे कमावण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

 

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत  देवाशीष घोषने सांगितलं की, 'दिग्दर्शक मला कामासाठी आधी हो बोलतात, पण आमिर खान आणी माझा चेहरा सारखा असल्यामुळे मला कामासाठी नकार देतात. त्यामुळे मला आमिरची नक्कल करण्याचा रोल मिळतो. आमिर यांचा चित्रपट वर्षातून एकदा येतो. त्यामुळे मला काम देखील मिळत नाही.'

 देवाशीष घोष सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतो. त्याची आणि आमिर खानची भेट देखील झाली आहे. आमिरसोबत क्लिक केलेला फोटो देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.  देवाशीष घोषने  'पवित्र रिश्ता', 'बड़े अच्छे लगते हैं' आणि 'माता की चौकी' या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे.