मुंबई : एक काळ असा होता जेव्हा प्रत्येक महिला डोक्यावर पदर घेवून असायच्या, त्या दिवसांमध्ये बॉलिवूडची एक अशी अभिनेत्री जिने तब्बल चार मिनिटं किसिंग देत महिलांवर लादल्या जाणाऱ्या सर्व मर्यादांवर मात करत स्वतःचा एक वेगळा ठसा उमटला. त्या अभिनेत्रीची भारतीय सिनेविश्वातील पहिली ड्रीम गर्ल म्हणून ओळख आहे. त्या अभिनेत्रीचं नाव आहे देविका राणी (Devika rani). आजही त्यांचे चाहते त्यांना नक्कीचं विसरले नसतील. जेव्हा पण बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींची नावं घेतली जातात तेव्हा त्या यादीत देविका यांचं देखील नाव असतं.
1933 साली देविका यांनी सर्व मर्यादा मागे ठेवत सर्व प्रकारच्या भुमिका साकारल्या. त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. 30 मार्च 1908 साली जन्म झालेल्या देविका यांनी त्यांच्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्व चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांचा जन्म विशाखापट्टनममध्ये झाला. जेव्हा देविका यांनी रूपेरी पडद्यावर किसिंग सिन दिला तेव्हा सर्व अभिनेत्री अशा सिनपासून लांब राहत होते.
देविका राणी यांनी 1933 साली 'कर्मा' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये एन्ट्री करताच त्यांनी बोल्ड सिन दिले. त्यांच्या चार मिनिटांच्या किसिंग सिनने सर्वांना हैराण केलं. त्यांच्या आधी कधीचं कोणत्याचं अभिनेत्रीने रूपेरी पडद्यावर किसिंग दिलं नव्हतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेव्हा त्यांना दादासाहेब फाळके आणि पद्मश्री पुरस्काराने गैरविण्यात आलं होतं.
देविका यांनी 10 वर्षांच्या करिअरमध्ये तब्बल 15 सिनेमांमध्ये काम केलं. त्यांनी नेहमी समाजाचे विचार बदलतील अशा सिनेमांमध्ये काम केलं. त्यांच्या चाहत्यांची संख्या भारतातच नाही तर सातासमुद्रा पार देखील फार मोठी होती.