जान्हवी-इशानच्या 'धडक'चा सोशल मीडिया रिव्ह्यू

करण जोहर प्रोडक्शनचा हा सिनेमा मराठी सिनेमा 'सैराट'चा रिमेक आहे

Updated: Jul 26, 2018, 11:16 AM IST
जान्हवी-इशानच्या 'धडक'चा सोशल मीडिया रिव्ह्यू  title=

मुंबई : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी आणि अभिनेता शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर यांचा 'धडक' पडद्यावर झळकलाय. या सिनेमाला सिनेपरिक्षकांकडून चांगला रिव्ह्यू मिळाला नाही... त्यानंतर, प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद अपेक्षित असला तरी 'गड्या आपला सैराटच बरा' असं म्हणत प्रेक्षकांनीही या सिनेमाला पाठ दाखवलीय. करण जोहर प्रोडक्शनचा हा सिनेमा मराठी सिनेमा 'सैराट'चा रिमेक आहे.