शबाना आझामीपुर्वी 'या' अभिनेत्रीसोबत वयाच्या 72 व्या वर्षी धर्मेंद यांनी दिला होता Liplock सीन

Dharmendra Kiss Shabana Azmi: अभिनेते धर्मेंद यांनी आपल्या 87 वर्षात पदार्पण केले आहे त्यातूनच त्यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचीही जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यातून या चित्रपटातील त्यांच्या किसिंग सीनची चर्चा रंगली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 29, 2023, 04:15 PM IST
शबाना आझामीपुर्वी 'या' अभिनेत्रीसोबत वयाच्या 72 व्या वर्षी धर्मेंद यांनी दिला होता Liplock सीन  title=
July 29, 2023 | dharmendra kissing scene with shabana azmi before he had kissed actress nafisa ali in life in metro

Dharmendra Kiss Shabana Azmi: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची. या चित्रपटानं अल्पावधीच मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. परंतु सध्या या चित्रपटातील एका सीनमुळे मात्र चाहत्यांना पुरता धक्का बसला आहे. या चित्रपटात 87 वर्षीय धर्मेंद आणि शबाना आझामी यांचा लिपलॉक सीन दाखवण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांचा पूर आला आहे. यावेळी अभिनेत्री शबाना आझामी आणि धर्मेंद यांच्या या किसिंग सीनमुळे चाहत्यांना धक्का बसला असला तरीसुद्धा आता या सीननंतर चित्रपट पुढारलेला आहे की त्यातून या वर्षी हा धर्मेंद यांचा एव्हरग्रीन रोमान्स आहे यावरून चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे काहींनी त्यांचे कौतुक केले आहे तर काहींनी मात्र त्यांच्यावर टीका केली आहे. सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात त्यांना ट्रोलही केलं आहे. परंतु तुम्हाला माहितीय का हा काही धर्मेंद्र यांचा या वयातला पहिलाच कीस नाही. 

यापुर्वीही त्यांनी वयाच्या 72 व्या वर्षी किसिंग सीन दिला होता. गेल्या वर्षभरापासून 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. हा चित्रपट करण जोहरचा सर्वाधिक मोठा आणि मोस्ट अवेडेट चित्रपट आहे. त्यामुळे 25 व्या वर्षातला हा त्याचा लॅण्डमार्क चित्रपट होता. महागडे सेट्स, कॉश्चूम्स, डान्स, संगीत, ड्रामा, रोमान्स, इमोशन्स असे सर्वच आपल्यालाही या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यातून यावेळी या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतरही प्रेक्षकांची इच्छा ताणली होती. आता अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून हा चित्रपट 28 जूलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यातून या चित्रपटानं आत्तापर्यंत 10 कोटींच्यावर बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. 

हेही वाचा - मंगळागौर म्हणजे? प्रश्न विचारल्यावर वंदना गुप्ते म्हणाल्या; 'लग्नानंतर हनिमून आणि मग...'

परंतु तुम्हाला माहितीये का की धर्मेंद्र यांनी वयाच्या 87 व्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातून शबाना आझामींसोबत किसिंग सीन दिला आहे. त्यातून शबाना आझामींच्याही एका लेसबियन सीनची बरीच चर्चा रंगलेली होती. शबाना आझामी यांच्याआधी धर्मेंद्र यांनी वयाच्या 72 व्या वर्षी नफिसा अली यांच्यासह किसिंग सीन दिला होता. हा चित्रपट होता 2007 साली आलेल्या 'लाईफ इन मेट्रो' या चित्रपटातील आहे. 

त्यातून 1996 आलेल्या 'फायर' या चित्रपटात शबाना आझमी यांचा लेसबियन किसिंग सीन होता. या चित्रपटात नंदिता दासही होत्या.