सोपं नव्हतं काही.... पाहा, महेश मांजरेकर यांनी अशी केली कॅन्सरवर मात

अशीच जिद्द त्यांनी बाळगली होती   

Updated: Oct 27, 2021, 04:24 PM IST
सोपं नव्हतं काही.... पाहा, महेश मांजरेकर यांनी अशी केली कॅन्सरवर मात
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर सध्या त्यांच्या आगामी चित्रपटामुळे प्रकाशझोतात आले आहेत. अभिनेता सलमान खान आणि आयुष्य शर्मा त्यांच्या या चित्रपटातून मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट महेश मांजरेकर यांच्यासाठी अतिशय खास आहे. त्यामागचं कारणंही अगदी तसंच आहे. 

'अंतिम- द फायनल ट्रूथ' या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करणं त्यांच्यासाठी तितकं सोपं नव्हतं. चित्रीकरणादरम्यानच त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. ज्यामध्येच त्यांच्यापुढे हा चित्रपट पूर्ण करण्याचं आवाहन होतं. 

चित्रीकरण अखेरच्या टप्प्यात असताना त्यांना कॅन्सरचं निदान झालं. या दरम्यानच्या काळात उपचारांदरम्यान त्यांचं 35 किलो वजन कमी झालं होतं. 

आनंदाची बाब अशी, की मांजरेकरांनी आता या गंभीर आजारावर मात केली आहे. किमोथेरेपीचा त्यांना फार त्रास नाही झाला. चित्रीकरणादरम्यानही थेरेपी सुरुच होती. 

पुढे ते शस्त्रक्रियेसाठी गेले. यादरम्यान त्यांचं काम सुरुच होतं. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आपल्याला धक्का बसला नव्हता, अशी प्रतिक्रिया मांजरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. 

अनेकजणांना हा आजार होतो आणि ते यावर यशस्वी मातही करतात, हे आपण जाणत होतो आणि याच प्रचंड सकारात्मकतेने या आजाराशी दोन हात केल्याचं मांजरेकर यांनी सांगितलं. 

मांजरेकर यांची कॅन्सरमुक्त होण्याची ही बातमी त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना अर्थातच आनंद देऊन गेली आहे. अनेकांनीच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थनाही केली आहे.