'15 मिनिटांसाठी 1 लाख रुपये, परवडत असेल तरच मला भेटा' अनुराग कश्यपने केली घोषणा

Anurag Kashyap:   यापुढे अनुराग 15 मिनिटांच्या भेटीसाठी 1 लाख रुपये चार्ज करणार असल्याचे सांगतोय. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 23, 2024, 01:41 PM IST
'15 मिनिटांसाठी 1 लाख रुपये, परवडत असेल तरच मला भेटा' अनुराग कश्यपने केली घोषणा title=
Anurag Kashyap Meeting Rates

Anurag Kashyap: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक लक्षवेधी पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टमुळे सर्वजण अचंबित झाले आहेत. लोकांना भेटण्यात आपला खूप वेळ गेल्याची खंत यात त्याने व्यक्त केलीय. त्यामुळे यापुढे तो 15 मिनिटांच्या भेटीसाठी 1 लाख रुपये चार्ज करणार असल्याचे सांगतोय. त्याला नक्की काय म्हणायचंय सविस्तर जाणून घेऊया. 

अनुराग कश्यपने आतापर्यंत अनेक हिट सिनेमा दिले आहेत. रमन राघव 2.0, गॅंग्स ऑफ वासेपूर, मनमर्जिया, गुलाल, देव डी, मुक्काबाज, ब्लॅक फ्रायडे अशा त्याच्या हिट सिनेमांची यादी संपता संपत नाही. तो अनेक नवोदित अभिनेते, तंत्रज्ञ आणि इतर सहाय्यकांना आपल्या सिनेमातून वेळोवेळी संधी देत असतो. अनुरागच्या हातात सिनेमा असेल तर हिट होणार,याची गॅरंटी अनेकांना असते. त्यामुळे हजारो लोक त्याची भेट घेत असतात. पण यातील बहुतांश भेटीतून काही निष्पन्न होत नसल्याचे त्याच्या लक्षात आलंय. 

काय म्हणाला अनुराग? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

अनुराग आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हणतो, मी नवोदितांना मदत करण्यात मी माझा खूप वेळ घालवला, ज्याचा शेवट खूपच वाईट झाला. त्यामुळे आता यापुढे जे स्वत:ला हुशार समजतात अशा कोणत्याही व्यक्तींसोबत मिटींग करण्यात मी माझा वेळ फुकट घालवणार नाही.

आता यापुढे माझे रेट्स ठरलेले असतील. 

कोणाला मला भेटण्याची इच्छा असेल तर 10 ते 15 मिनिटांसाठी मी त्यांच्याकडून 1 लाख रुपये चार्ज करेल. अर्ध्या तासाच्या भेटीसाठी 2 लाख आणि 1 तासाच्या भेटीसाठी 5 लाख रुपये चार्ज करणार असल्याचे त्याने सांगितले.

लोकांना भेटण्यात वेळ फुकट जात असल्याने मी आता दमलोय. हे रेट्स परवडतायत असं तुम्हाला खरंच वाटत असेल तर मला कॉल करा अन्यथा दूर राहा, असे त्याने सांगितले. तसेच पेमेंट अगोदर करा, हेदेखील त्याने शेवटी सांगितले.  

काय आल्या प्रतिक्रिया?

यावर आलिया कश्यपने कमेंट केली आहे. तुझ्यासाठी मला स्क्रिप्ट पाठवणाऱ्या, मेसेज करणाऱ्या आणि ईमेल करणाऱ्या सर्वांना मी हा मेसेज फॉर्वर्ड करतेय असे तिने म्हटले आहे. 

तर काही युजर्स यावरुन अनुरागची खिल्ली उडवत आहेत. सर, मी तुमच्या दरवाज्याची बेल वाजवणारच होतो, इतक्यात हे वाचले असे एकाने म्हटलंय. तर ही कंगना फेजची सुरुवात तर नाहीना? असा प्रश्न एकाने विचारलाय.