'तारक मेहता...'च्या सेटवर पोहोचली दिशा वकानी; मलिकेत दयाबेन पुन्हा करणार एन्ट्री?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.  

Updated: Apr 20, 2021, 09:58 AM IST
'तारक मेहता...'च्या सेटवर पोहोचली दिशा वकानी;  मलिकेत दयाबेन पुन्हा करणार एन्ट्री?

मुंबई :  'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. ही मालिका टप्पूसेनेमुळे लहान मुलांना तर गोकुळ धाम सोसायटीतील एकीमुळे मोठयांना आवडते.  दयाबेन, जेठालाल, टप्पू, बापूजी, पोपटलाल आणि शोचे अन्य कलाकार तर प्रेक्षकांच्या जवळचे झाले आहेत. पण आज देखील मालिकेतील दयाबेनची कमी प्रेक्षकांना जाणवते. 2016 साली दयाबेन अर्थान दिशा वकानीने मालिकेतून काढता पाय घेतला. पण इतक्या वर्षांनंतरही दयाबेनच्या चाहत्यांची संख्या काही कमी झालेली नाही. 

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार दिशा वकानी मालिकेच्या सेटवर पोहोचली होती. त्यामुळे दिशा मालिकेत पुन्हा पदार्पण करणार का? अशा चर्चा रंगत आहेत. दिशा आता मालिकेचा भाग नसली तरी, अन्य कलाकारांसोबत तिचे संबंध चांगले आहेत. 2016 साली दिशा मॅटरनिटी लिव्हसाठी गेली होती. पण त्यानंतर  दिशा पुन्हा मालिकेत चाहत्यांचं मनोरंजन करण्याासाठी दाखल होणार अशी चर्चा रंगत होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Disha Vakani (@disha.vakani)

दिशा मालिकेत पुन्हा पदार्पण करेल की नाही अद्याप समोर आलेलं नाही. तर दिशा तिच्या सहकलाकारांना भेटण्यासाठी मालिकेच्या  सेटवर पोहोचली होती असं सांगण्यात येत आहे. सध्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या सेटवर कोरोनाने शिरकाव केला आहे. 

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या सेटवर देखील कोरोना ग्रस्तांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मालिकेच्या सेटवर तब्बल 110 लोकांची RT-PCR चाचणी करण्यात आली. ज्यामध्ये 4 लोकांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.