दिव्या खोसला कुमार ट्रोल; अभिनेत्रीचा ड्रेस लोकांना वाटतोय 'बिग बॉस'चा डोळा

 बॉलीवूडच्या हिरोईन्स अनेकदा घराबाहेर असा ड्रेस घालून जातात की, त्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात.

Updated: Apr 25, 2022, 07:22 PM IST
दिव्या खोसला कुमार ट्रोल; अभिनेत्रीचा ड्रेस लोकांना वाटतोय 'बिग बॉस'चा डोळा title=

मुंबई : बॉलीवूडच्या हिरोईन्स अनेकदा घराबाहेर असा ड्रेस घालून जातात की, त्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात. यावेळीही असच काहीसं घडलं. सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या खोसला कुमार नुकतीच एका रिएलिटी शोच्या सेटबाहेर दिसली. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी तिला प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली.

परिधान केला गोल्डन ब्लॅक ड्रेस
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिव्या खोसला कुमार गोल्डन ब्लॅक रंगाचा ड्रेस परिधान करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा ड्रेस एकदम बॉडीफिट आहे. जो व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

गोल्डन कलरचा टॉप
अभिनेत्रीच्या या गाऊनचा खालचा भाग काळ्या रंगाचा आहे. तर स्कर्टच्या वरचा भाग गोल्डन रंगाचा आहे. या ड्रेसची स्टाइल पाहून ट्रोलर्सना 'बिग बॉस ट्रॉफी' आठवली आणि त्यांनी अभिनेत्रीला ट्रोल करायला सुरुवात केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओ व्हायरल होताच ट्रोल 
दिव्या खोसला कुमारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच ती तिच्या ड्रेसमुळे ट्रोल होतेय. अभिनेत्रीचा गाऊनवरील लूक पाहून एका यूजरने कमेंट केली, 'बिग बॉस ट्रॉफी ऑफ द सीझन.' दुसरीकडे, अजून एका यूजरने कमेंट करत लिहीलं की, 'बिग बॉस 15'ची ट्रॉफी परिधान करून आली आहे. त्याचबरोबर, अजून एका युजर्सने लिहिलं की,  'ही परीपण आता उडेल का?काय लोकं काहीही घालतात