प्रेग्नेंसीचा 10 वा महिना तरी डिलीव्हरी होईना! अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट

Drashti Dhami Pregnency: अभिनेत्री दृष्टीने इंस्टाग्रामवर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. फ्रेंड्सच्या रेचेल ग्रीनसोबत तिने स्वत:ची तुलना केली आहे. 

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 22, 2024, 03:46 PM IST
प्रेग्नेंसीचा 10 वा महिना तरी डिलीव्हरी होईना! अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट
प्रग्नेन्सीचा दहावा महिना

Drashti Dhami Pregnency: प्रग्नेन्सीचे 9 महिने पूर्ण झाल्यावर डिलीव्हरी होते, हे सर्वश्रुत आहे. पण एका अभिनेत्रीने प्रग्नेन्सीच्या 10 व्या महिन्यात प्रवेश केलाय. ती आता बाळाची वाट पाहतेय. तिने सोशल मीडियावर पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिली.  आपण बोलतोय ते टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामी हिच्याबद्दल. अभिनेत्री दृष्टी लग्नाच्या 9 वर्षांनंतर आई होणार आहे. ती सध्या 39 वर्षाची असून आपल्या गरोदरपणाच्या प्रवासाचे अपडेट्स नेहमी सोशल मीडियातील फॅन्ससोबत शेअर करत असते. सध्या अभिनेत्री दृष्टी तिच्या प्रेग्नेंसीमुळे हैराण आहे. आपल्या बाळाची वाट पाहून ती थकली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

दृष्टीची प्रसूती होईना 

अभिनेत्री दृष्टीने इंस्टाग्रामवर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. फ्रेंड्सच्या रेचेल ग्रीनसोबत तिने स्वत:ची तुलना केली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती कॅमेरावर तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते,  तुम्ही बरोबर ऐकले आहे, बाळ अजून आलेले नाही. यावर तिने कॅप्शन लिहिले की, 41 आठवडे उलटले पण ते अद्याप आले नाही. बेबी आता मला खरच त्रास देऊ लागली आहे. दृष्टी धामीने तिच्या गरोदरपणाच्या 10व्या महिन्यात प्रवेश केला आहे. तिची प्रसूती अद्याप झालेली नाही.

अभिनेत्री दृष्टीकडून एक मजेदार व्हिडिओ शेअर 

दृष्टीचे चाहते तिच्या या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. गेल्या वर्षी एका मुलीला जन्म देणारी दिशा परमार म्हणाली, '...आणि माझ्या बाळाला घाई होती, अवघ्या 37 आठवड्यांतच आले.' एका यूजरने लिहिले की, 'बेबी दिवाळी येण्याची वाट पाहत आहे.' दुसऱ्याने लिहिले, "चला..आता वाट पाहू शकत नाही बाळा... बाहेर ये.' दुसऱ्याने लिहिले, 'दिवाळीला बाळ म्हणेल – तू आमचे स्वागत नाही करणार का?'

दृष्टी पहिल्या मुलाला देणार जन्म 

याआधीही दृष्टीने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात ती म्हणत होती, मी वाट पाहून थकली आहे. ही प्रतीक्षा मला मारत आहे. अभिनेत्री दृष्टीचे हे पहिलेच अपत्य आहे. तिने 2015 मध्ये बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्न केले. या अभिनेत्रीने लग्नाच्या 9 वर्षानंतर या वर्षी जूनमध्ये सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. दृष्टी मधुबाला हिने एक इश्क एक जुनून, सिलसिला बदलते रिश्तों का, गीत हुई सबसे पराई, एक था राजा और एक थी रानी आणि देश में है मेरा दिल यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More