Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला ईडीने परदेशात जाण्यापासून रोखलं, नक्की प्रकरण काय?

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

Updated: Dec 5, 2021, 09:07 PM IST
Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला ईडीने परदेशात जाण्यापासून रोखलं, नक्की प्रकरण काय?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. ईडीने जॅकलीनला मुंबई एअरपोर्टवर थांबवलं. लूक आऊट सर्क्युलरमुळे अभिनेत्रीला थांबल्याचं बोललं जात आहे. मुंबईहून दुबईला जात असताना जॅकलिनला विमानतळावर थांबवण्यात आलं.

ईडीचा दावा, सुकेशने जॅकलिनला करोडोंचे गिफ्ट दिले होते
सुकेश चंद्रशेकर 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात  अभिनेत्रीची दोनदा चौकशी करण्यात आली आहे. सुकेशने जॅकलीनला करोडोंच्या भेटवस्तू दिल्या. ज्यामध्ये BMW कार, 4 मांजरी, फोन आणि दागिन्यांसोबत बरीच रक्कम जॅकलिनच्या खात्यात ट्रान्सफर केलं होतं.

जॅकलीन आणि सुकेश काही काळ रिलेशनशिपमध्ये होते
सुकेशच्या २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ७ हजार पानांची चार्जशीट दाखल केली होती. या चार्जशीटमध्ये 8 जणं आरोपी आहेत. जॅकलिन आणि सुकेशही काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. विशेष म्हणजे जॅकलिनला ईडीकडून सांगण्यात आलं की, जोपर्यंत हे प्रकरण सुरू आहे. तोपर्यंत ती परदेशात जाऊ शकत नाही. याच कारणामुळे तिला मुंबई एअरपोर्टवर थांबवण्यात आलं.