बॉलिवूडमधील 70 च्या दशकातील सर्वात टॉपची अभिनेत्री आणि सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून मुमताज या ओळखल्या जायच्या. बॉलिवूडमध्ये एकापाठो पाठ हिट चित्रपट देत असताना अचानक लग्न करून त्यांनी सिनेसृष्टी सोडली. त्या काळात मुमताज आणि राजेश खन्ना यांची जोडी हिट ठरली होती. या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती. दुसरीकडे अभिनेत्याने शर्मिला टागोरसोबतही अनेक चित्रपटात काम केलं. तुम्हाला माहिती नसेल पण त्या काळात मुमताज आणि शर्मिला यांच्यामध्ये वैर होतं, अशा बातम्या समोर आल्या होत्या. कारण मुमताज एकदा म्हणाल्या होत्या की, 'मी शर्मिलाशी कधीही मैत्री करु शकत नाहीत, आम्ही कधीही हँग आउट करु शकत नाही.' त्यानंतर या दोघींमध्ये वैर आहे अशा बातम्या समोर आल्यात.
रेडिफशी बोलताना मुमताज म्हणाल्या की, 'मी शर्मिला टागोरचा खूप आदर करते. ती माझ्यापेक्षा खूप शिकलेली आणि जाणकार आहे. मी वयाच्या आठव्या वर्षापासून काम करत आहे, मी माझ्या कामाच्या दरम्यान सर्व काही शिकलंय. शर्मिला असो किंवा इतर कोणतीही अभिनेत्री, मला त्यावेळी फारशी भेटायला वेळ मिळाला नाही.' त्या पुढे म्हणाल्यात की, 'पण हो, मी शर्मिलाजींपेक्षा काका म्हणजेच राजेश खन्ना यांच्यासोबत जास्त चित्रपट केले. देवाची इच्छा होती की काकांसोबतचा माझा एकही चित्रपट फ्लॉप झाला नाही, तर शर्मिलाजींचा राजेश खन्नासोबतचा चित्रपटही फ्लॉप झालेत. माझं शर्मिलाशी वैर नाही'
मुमताज म्हणाल्या की, राजेश खन्ना यांनी दोन्ही अभिनेत्रींसोबत काम केलं होतं पण त्यांनी कधीही शत्रुत्व पत्करलं नाही. शर्मिलाजींच्या विरोधात त्यांनी एक शब्दही बोलला नाही. पण जेव्हा मी धर्मेंद्र किंवा देवसाब यांसारख्या अभिनेत्यांसोबत चित्रपट साईन करायची तेव्हा ते अस्वस्थ व्हायचे. पण राजेश खन्ना यांनी इतर हिरोईनसोबत काम केलं पण मी कधीच माझा राग व्यक्त केला नाही. त्याचा माझ्यावर हक्क आहे असे त्यांना वाटलं पण काही फरक पडला नाही, त्याने माझी काळजी घेतली.
टाइम्स एंटरटेनमेंटला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने शर्मिला टागोरसोबतच्या आपल्या वैराबद्दल बोलल्या होत्या. त्या म्हणाल्यात की, आमच्यामध्ये कधीच मैत्री असू शकत नाहीत, आजही नाही आणि तेव्हाही नाही. आम्ही कधीही एकत्र जेवण करत नाही, कधीही हँग आउट करत नाही. हे नेहमीच असंच राहिलंय.
अलीकडेच 77 वर्षांच्या मुमताजने दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला. 'त्यांच्यासोबत काम करणं आनंदासारखं होतं, दोघांनीही त्यांची खूप काळजी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मला शूटिंगदरम्यान पहिल्याच सीनमध्ये दिलीप साहेबांना मारायचं होतं, पण मी ते करू शकले नाही, यावर ते म्हणाले की, मला मार, तुम्ही हे करू शकता.'