Anant-Radhik Pre Wedding Photoshoot : आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा लहान मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा विवाह सोहळा 12 जुलैला पार पडणार आहे. उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटबरोबर (Radhika Marchent) अनंत अंबानी लग्नगाठ बांधणार आहे. अनंत-राधिकाच्या लग्नाची गेल्या दोन महिन्यांपासून तयारी सुरु आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये अनंत-राधिकाचा पहिला प्री-वेडिंग सोहळा (Anat-Radhika Pre-Wedding) पार पडला. त्यानंतर इटलीत एका अलीशान क्रुझवर दुसरा प्री-वेडिंग सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेहोते.
कोण आहे तो फोटोग्राफर?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमधून प्री-वेडिंग सोहळ्यातील भव्यता दिसून येते. अनंत-राधिकाचे फोटोचंही लोकांनी कौतुक केलं. हे फोटो कॅमेरात कैद करण्याची जबाबदारी पार पाडली ती फोटोग्राफर जोसेफ राधिक (Joseph Radhik) याने. सिनेमेटोग्राफर जोसेफ राधिकचं दिवसाचं मानधन जवळपास 25 लाख रुपये ते1.50 लाख रुपये इतकं आहे. याशिवाय त्याच्या राहाण्या-खाण्याचा खर्चही केला जातो. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगचे फोटोही जोसेफ राधिकनेच आपल्या कॅमेरात कैद केले आहेत.
फोटोग्राफरआधी इंजिनिअर
जोसेफ राधिकने फोटोग्राफीत आपली कारकिर्द करण्याआधी सहा वर्ष इंजिनिअरची नोकरी केली. तसंच तीन वर्ष त्याने कॉर्पोरेट नोकरीही केली. गोव्यात टूथपेस्ट विकण्याचं कामही त्याने केलं. पण त्याचं स्वप्न फोटोग्राफर बनण्याचं होतं. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जोसेफ राधिकने नोकरी सोडली आणि व्यावसायिक फोटोग्राफर बनण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये त्याने कॅमेरा हाती घेतला.
सेलिब्रेटींचा फोटोग्राफर
सध्याच्या घडीला सेलिब्रेटींचा फोटोग्राफर अशी जोसेफ राधिकची ओळख बनली आहे. बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांच्या लग्नात जोसेफने फोटोग्राफी केली आहे. यात कतरीना कैफ आणि विक्की कौशल, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या जोड्यांचा समावेश आहे. याशिवाय केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नातही जोसेफने फोटोशूट केलं आहे.
चार दिवस रंगाल प्री-वेडिंग सोहळा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा चार दिवस रंगला होता. हा सोहळा इटलीच्या पोर्टफिनोतल्या एका अलिशान क्रुजवर रंगलाहोता. पहिल्या दिवशी पाहुण्यांचं स्वागत आणि जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यानंतर एक इटालियन थीम पार्टीचं आयोजन करण्यात आलंहोतं. याचं नाव 'स्टारी नाईट' असं ठेवण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशई क्रुजच्या डेकवर टोगा पार्टी ठेवण्यात आली होती. तिसऱ्या दिवशी कान्सच्या धर्तीवर मुखवटा पार्टी रंगली.