Kajol तिसऱ्यांदा आई होणार? नक्की काय आहे प्रकरण

 तिच्या ड्रेसमुळे काजोलला बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागत आहे.

Updated: Mar 20, 2022, 05:34 PM IST
  Kajol तिसऱ्यांदा आई होणार? नक्की काय आहे प्रकरण title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी वैयक्तिक आयुष्यामुळे ती सतत चर्चेत असते. काही दिवसापूर्वी तिने मुंबईत नवीन घर घेतल्यामुळे चर्चेत आली होती.

आता ती एका पार्टीतील व्हिडिओमुळे खूपच ट्रोल झाली. तिचा पार्टीतील लूक पाहून सध्या ती प्रेग्नेंट असल्याचं बोललं जात आहे. तिच्या ड्रेसमुळे काजोलला बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागत आहे.

होळीच्या एक दिवसाआधी करण जोहरने खास पार्टीचं आयोजन केलं होतं. कारण यादिवशी धर्मा प्रोडक्शनच्या CEO अपूर्व मेहता यांचा वाढदिवस होता.

या पार्टीत कतरिना कैफ, विकी कौशल, जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, विजय देवरकोंडा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

त्यापैकी काजोल देखील एक होती. ती यावेळी एकटीच पार्टीमध्ये दिसून आली. काजोलने पार्टीला ब्लॅक कलरचा ऑफ-शोल्डर ड्रेस घातला होता. ती या पार्टीतून बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यानंतर   अभिनेत्रीचं बेबी बंप दिसत असल्याची एकच चर्चा सुरु झाली. या व्हायरल व्हिडिओमुळे काजोल प्रेग्नेंट आहे का असा प्रश्न देखील विचारला जाऊ लागला.यावरूनच लोक तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज लावू लागले आहेत.

पण काजोल प्रेग्नेंट असल्याची केवळ अफवा पसरवण्यात आली आहे. तिच्या ड्रेसमुळे तिचं बंप दिसत असल्याने तिला सध्या मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.