Karmita Kaur MMS Video Leaked: सोशल मीडिया हे माध्यम प्रसिद्धीसाठी उत्तम आहे तसेच ते बदनामीसाठी घातक ठरु लागले आहे. इंस्टाग्राम इन्स्फ्लूएन्सर्स हे चाहत्यांसाठी सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत. या यादीत करमिता कौरचे नाव देखील घेतले जाते. कर्मिता तिच्या सोशल अकाऊंटवर ग्लॅमरस व्हिडिओ शेअर करत असते. तिचे लाखो फॉलोअर्सशी यावर कमेंट्स, लाईक्स करत असतात. पण आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
इंस्टा मॉडेल कर्मिता कौर नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील झलकही शेअर करताना दिसते. दरम्यान कर्मिता एका मोठ्या संकटात अडकली आहे. कर्मिताचा एक कथित एमएमएस व्हिडिओ इंटरनेटवर लीक झाला आहे. या व्हिडिओमुळे कर्मिताच्या आयुष्यात खळबळ उडाली आहे. यानंतर कर्मिताला इंटरनेटवर प्रचंड ट्रोलिंग आणि द्वेषाचा सामना करावा लागत आहे.
कर्मिता कौर ही एक सोशल मीडिया प्रभावशाली तसेच पंजाबी अभिनेत्री असल्याचे म्हटले जाते. ती इन्स्टाग्रामवर तिची ग्लॅमरस स्टाइल आणि लक्झरी लाइफस्टाइल शेअर करत असते. कर्मिताच्या इन्स्टा अकाऊंटवर त्याचे 1 मिलियनहून अधिक चाहते आहेत.
अलीकडेच कर्मिताच्या नावाशी संबंधित एमएमएस सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ टेलिग्राम तसेच पॉर्न साइटवर व्हायरल होत आहे. या प्रकरणावर कर्मिताने प्रतिक्रिया दिल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ फेक असून लोकांनी तो शेअर करू नका असे आवाहन तिने केले आहे.
याआधी 'कुल्हड पिझ्झा' कपलचा एमएमएस व्हिडिओ लीक झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे हे जोडपे बराच काळ अडचणीत राहिले. मात्र, नंतर हा व्हिडीओ खोटा असून या दाम्पत्याची बदनामी करण्यासाठी तो एआयच्या मदतीने बनवण्यात आल्याचे उघड झाले. हे प्रकरण नुकतेच थंडावले होते. पण आता कर्मिताचा बेडरूमचा व्हिडिओ लीक झाल्याने नवा वाद समोर आला आहे.
गेल्यावर्षी कच्च्या बदाम फेमअंजली अरोरा इंटरनेट सेन्सेशन बनली. पण त्यानंतर समोर आलेल्या कथित एमएमएस स्कँडलमुळे अंजली खूप चर्चेत आली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोकांनी अंजलीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावेळी काही लोक तिच्या समर्थनार्थ पुढे आले होते पण बहुतांश लोकांनी व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी अंजली अरोरा असल्याचा दावा केला होता. पण अंजलीने हे आरोप फेटाळून लावले होते.