मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वातून अनेक धक्कादायक बातम्या समोर येत असताना आणखी एक हदरवणारी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे. एका प्रसिद्ध गायिकेच्या हत्येचा कट रचला जात आहे. ही गायिका दुसरी तिसरी कोणी नसून गायिका वैशाली भैसने-माडे आहे. वैशालीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये तिने सध्या मला सर्वांच्या मदतीची गरज असल्याचं देखील सांगितलं आहे.
गायिका वैशालीने सोशल मीडिया पोस्टमध्ये, 'काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन मी याचा गौफायस्फोट करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे'.
तिची पोस्ट पाहून सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता दोन दिवसांनंतर पत्रकार परिषदेत वैशाली काय गौफायस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वैशालीबद्दल सांगायचं झालं, काही महिन्यांपूर्वी तिने राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला आहे.
वैशालीने काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिच्याकडे विदर्भाचं विभागीय अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला होता.