Malaika Arora : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांच्यावर दु:खाच डोंगर कोसळला. बुधवारी (11 सप्टेंबर) ला त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली. या घटनेच्या वेळी मलायका अरोरा ही पुण्यात एका कार्यक्रमासाठी गेली होती. तिला माहिती मिळाल्यानंतर मलायकाने मुंबई गाठली. या घटनेनंतर त्यांना आधार देण्यासाठी अख्ख बॉलिवूड आलं होतं. मलायकाने सोशल मीडियावर वडिलांच्या निधनाची बातमी दिली. त्यावेळी तिने माजी मर्चंट नेव्ही ऑफिसर असलेल्या अनिल मेहता यांच्या निधनाबद्दल सांगितलं.
यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून अनेक प्रश्न विचारले जात आहे. वडिलांचं नाव अनिल मेहता होतं तर मलायका आणि अमृता अरोरा आडनाव कोणाचं लावतात? अनिल मेहता हे मलायकाचे सावत्र वडील आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थितीत करण्यात येत आहेत. खरं तर मलायका अरोराने एका मुलाखतीने सांगितलं होतं की, ती जेव्हा 11 वर्षांची होती तेव्हा तिची आई आणि वडील यांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटाच्या अनेक वर्षांनंतर अनिल मेहता पुन्हा एकदा मलायकाची आई जॉयस पॉलीकार्पसोबत राहिला आले होते.
जेव्हा मलायकाने वडिलांच्या निधनाची माहिती देणारी पोस्ट केली होती तेव्हा तिने लिहिलं होतं की, ते तिचे अतिशय चांगले मित्र होते. शिवाय, तिने त्यांचा उल्लेख अनिल मेहता असा केला आहे. मग मलायकाचे जन्मदाते कोण आहेत. अनिल मेहता यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1962 रोजी झाला होता तर मलायकाचा जन्म 23 ऑक्टोबर 1973 रोजी झाला होता.
अनेक मीडिया रिपोर्टनुसार मलायकाची आई जॉयस पॉलीकार्प यांचं अनिल मेहता यांच्याशी दुसरं लग्न होतं. जॉयस पॉलीकार्प यांना पहिल्या पतीपासून मलायका आणि अमृता अशी दोन मुली आहेत. काही कारणामुळे मलायकाच्या आईचं पहिलं लग्न मोडलं.
मल्याळी ख्रिश्चन असलेल्या जॉयस यांनी अनिल मेहतांशी दुसरं लग्न केलं आणि मलायका, अमृताला वडील मिळालेत. पण जॉयस आणि अनिल मेहतासुद्धा लग्नानंतर काही वर्षांनी वेगळे झाले. दोघांचा घटस्फोट झाला तेव्हा मलायका 11 वर्षांची होती. अनिल मेहता हे मलायकाचे सावत्र वडील असल्याचा फक्त दावा करण्यात येत आहे. याबद्दल अधिकृत काही माहिती समोर आलेली नाही.