मुंबई : 90 च्या दशकातील कलाकारांबद्दल सांगायचं झालं तर त्यांची लोकप्रियता अद्यापही कमी झालेली नाही. त्यामध्ये अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री जुही चावला यांचा देखील समावेश आहे. यशाच्या शिखरावर चढत असताना कलाकारांचे प्रेम प्रकरणं देखील तुफान चर्चेत आली. आज देखील त्यांच्या नात्यांच्या चर्चा रंगतात. जुही ९०च्या दशकात अतिशय लोकप्रिय होती. त्यामुळे तिच्यासोबत लग्न व्हावं अशी प्रत्येक तरुणाची इच्छा होती. हे स्वप्न सलमानने देखील पाहिलं पण तिचं स्वप्न पूर्ण झालं नाही.
महत्त्वाचं म्हणजे सलमानने जुहीसोबत लग्नची करण्याची इच्छा तिच्या वडिलांकडे व्यक्त केली. पण त्यांना अपेक्षित असलेल्या जावयाच्या चौकटीमध्ये मी बसत नसल्यामुळे त्यांनी मला नकार दिला’, असे सलमानने म्हटले होते. एका मुलाखतीमध्ये सलमानने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या. एवढंच नाहीतर जुही एक चांगली मुलगी आहे. ती एक उत्तम पत्नी आणि सून होवू शकते. असं देखील सलमान मुलाखतीत म्हणाला.
त्याकाळी जुही प्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळे तिच्यासोबत काम करण्याची इच्छा प्रत्येक अभिनेत्याची होती. पण ती निवडक अभिनेत्यांबरोबरच काम करण्याला पसंती देत होती. दरम्यान तिला सलमानसोबत काम करण्यासाठी ऑफर देण्यात आली. पण जुहीने तेव्हा सलमानसोबत काम करण्यास नकार दिला.
जुही चावलाने 1997 मध्ये बिझनेसमन जय मेहताला आपला जीवनसाथी बनवले, जो जुहीपेक्षा सात वर्षांनी मोठा आहे. तिची इच्छा असती तर जुही तिच्या कोणत्याही अभिनेत्यासोबत लग्न करू शकली असती, पण तिने नॉन-फिल्मी व्यक्तीला आपला जीवनसाथी बनवणं पसंत केलं. दोघांची भेट राकेश रोशनने केली होती.