मुंबई : 'द फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज' (FEICE) कडून सर एच.एन . रियायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलविरोधात नाराजीचा सूर आळवत तक्रार दाखल केली आहे. ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते Rishi Kapoor ऋषी कपूर यांचं गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. निधनापूर्वी त्यांना या रुग्णालयाच दाखल करण्यात आलं होतं. जेथे त्यांच्या जीवनातील अंतिम क्षणांचा एक व्हि़डिओ चित्रीत केला गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. याच व्हायरल व्हिडिओवर नाराजी व्यक्त करत रुग्णायाविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
FWICE कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पत्रामध्ये व्हिडिओसंबंधीचे काही मुद्दे मांडण्यात आले आहेत. ज्यामध्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला हा व्हिडिओ अतिदक्षता विभाग अर्थात आयसीयूमध्ये चित्रीत करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. या व्हिडिओमध्ये ऋषी कपूर रुग्णांच्या बेडवरल असून, त्यांना श्वासोच्छवास घेण्यास अडचण येत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
'३० एप्रिल या दिवशी व्हॉट्सऍपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणारा व्हिडिओ आमच्या निदर्शनास आला. हा व्हिडिओ अतिदक्षता विभागात घेतला गेल्याचं कळलं. जिथे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना २९ एप्रिलला दाखल करण्यात आलं होतं. ३० एप्रिलला सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी या ठिकाणीच अखेरचा श्वास घेतला. या व्हिडिओमध्ये कपूर यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं', असं या पत्रकात लिहिण्यात आलं होतं.
#BestOFRishiKapoor : अलविदा 'अकबर इलाहबादी'
शिवाय या व्हिडिओमध्ये ऋषी कपूर यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं असून, त्यांची खालावलेली प्रकृतीही दिसत आहे. शिवाय एक परिचारिकाही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मुख्य म्हणजे हा व्हिडिओ कपूर यांच्या कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय घेतल्याचंच इथे स्पष्ट होत आहे, ही बाब पत्रात उचलून धरण्यात आली. याच काही कारणांसह ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे ऋषी कपूर यांच्या जीवनातील अखेरच्या क्षणांचा तो व्हिडिओ आता वादाच्या भोवऱ्यात आला आहे, असंच म्हणावं लागेल.